श्री तुळजाभवानी मंदिरात हुताशनी पौर्णिमेनिमित्त पारंपरिक होलिकादहन उत्साहात संपन्न ; ग्रामस्थ, भावीकभक्त व मान्यवरांची उपस्थिती !
तुळजापूर प्रतिनिधी;- हुताशनी पौर्णिमेच्या निमित्त श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने होलिकादहनाचा सोहळा उत्साहात पार पडला. मंदिर परिसरातील होमकुंडासमोर विधीवत होळीचे पूजन करण्यात आले.
श्री तुळजाभवानी मंदिरातील होमकुंडासमोर होळीचे पूजन केल्यानंतरच तुळजापूर शहरातील घरोघरी होळी पूजन करण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार मंदिरातील होळी पूजनानंतर शहरात सर्वत्र होळी साजरी करण्यात आली.
हुताशनी पौर्णिमेच्या होळी सणाच्या निमित्ताने सायंकाळच्या अभिषेक पूजेची वेळ बदलून ती सायंकाळी ६ वाजता पार पडली. अभिषेक पूजेनंतर श्री तुळजाभवानी देवींची आरती व धुपारती करण्यात आली.
यावेळी सहायक व्यवस्थापक (धार्मिक) रामेश्वर वाले, महंत हमरोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, सहायक व्यवस्थापक (विद्युत) अनिल चव्हाण, संगणक अभियंता सुधीर कदम, सहायक सुरक्षा निरीक्षक ऋषभ रेहपांडे यांच्यासह मंदिरातील इतर कर्मचारी, पुजारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






