छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत तुळजापूर तालुक्यात समाधान शिबिरांचे आयोजन!
तुळजापूर प्रतिनिधी :- तहसील कार्यालय तुळजापूर नायब तहसीलदार सौ. प्रियांकाताई काळे (लोखंडे) यांनी ५ वाजता पत्रकार परिषद घेऊन ही माहिती जाहीर केली . प्रशासनाच्या वतीने महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमधून नागरिकांच्या विविध महसूल विषयक तक्रारी व अर्जांचे तत्काळ निवारण करण्यात येणार आहे.
शिबिरात दिल्या जाणाऱ्या प्रमुख सेवा
प्रलंबित फेरफार नोंदींची दुरुस्ती
७/१२ मधील चुका दुरुस्त करणे
डिजिटल स्वाक्षरीसह ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वाटप
उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र
नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र
विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप
अकृषिक (NA) प्रकरणांबाबत मार्गदर्शन
पीएम किसान व अॅग्रीस्टॅक नोंदणी
सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ
घरकुलासाठी पैसे वाटप व ई-मोजणी अर्ज
तक्रारींचे निवारण
पाणंद रस्त्यांबाबत आदेश
भूमापन व अकृषिक परवानगी प्रकरणांची तपासणी
समाधान शिबिरांचे वेळापत्रक
७ मार्च २०२६ – सलगारा (दि.)
१४ मार्च २०२६ – इटकळ
२४ मार्च २०२६ – जळकोट
१० एप्रिल २०२६ – तामलवाडी
१७ एप्रिल २०२६ – आरळी (बु.)
२४ एप्रिल २०२६ – मंगरूळ
०४ मे २०२६ – सावर्गाव
०८ मे २०२६ – तुळजापूर
१५ मे २०२६ – नळदुर्ग
या अभियानासाठी तहसीलदार श्री. अरविंद बोळंगे, उपविभागीय अधिकारी श्री. ओमकार देशमुख व जिल्हाधिकारी श्री. कीर्तीकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरे आयोजित केली जात आहेत.
तरी तहसील प्रशासनाने नागरिकांना आपल्या महसूल विषयक समस्या घेऊन संबंधित गावातील शिबिरात उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.






