Best News Portal Development Company In India

मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांची निवड!

मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांची निवड
————————————————–
नळदुर्ग (एस.के.गायकवाड): राज्य पातळीवर कार्यरत असलेल्या मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक, विचारवंत, लेखक, सामाजिक व धार्मिक कार्यात सतत अग्रेसर असलेले सेवा निवृत्त प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांची निवड संस्थापक अध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष
प्रा.अनंत लांडगे यांनी नुकतच केली आहे.
सेवानिवृतांचे प्रश्न सोडविणे व सामाजिक काम करणे हे कार्य ही संघटना करते असून या संघटनेच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदाची निवड नुकतच जाहीर करण्यात आली असून फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील बुद्धी जिवी कार्यकर्ते विचारवंत साहित्य सेवा निवृत्त प्राचार्य कमलाकर कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. प्राचार्य कमलाकर कांबळे हे मूळचे तुगाव तालुका उमरगा येथील रहिवासी असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण करून काही काळ प्राध्यापक म्हणून नोकरी केली.त्यानंतर आंबेजोगाई येथील महाविद्यालयात ते प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले.नोकरी करत-करत त्यानी आपल्या सामाजिक कार्याकडे कधी दुर्लक्ष केलं नाही. सातत्याने काही ना काही उपक्रम ते आंबेजोगाई आणि तुगाव ता.उमरगा परिसरात राबवितात.दर वर्षी बौद्ध साहित्य परिषदेचे आयोजन करतात तर गेल्या दहा वर्षापासून ते आपल्या
मूळ गावी तुगाव ता.उमरगा या ठिकाणी दर २५ डिसेंबरला बौद्ध धम्म परिषद घेतात.त्या अनुषंगाने समाज प्रबोधन व्याख्यान धम्म गुरु पूज्य भन्तेजी यांची धम्मदेशना ( प्रवचण) अशा प्रकरि विविध कार्यक्रमाचे आयोजन ते करतात.त्यांचा एकूनच कार्याची दखल घेवून मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या सार्थ निवडी बद्दल मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाचे मराठवाडा अध्यक्ष बलभीमराव कोथिंबीरे,लातूर जिल्हाध्यक्ष प्रा.एस.टी.मस्के, प्रा.विजय श्रगांरे, माणिक पवार बी.बी.गायकवाड,मोहन कांबळे सेलूकर,प्रा.शंकर सोनवणे,
विनायक बोरीकर,प्रा.देविदास शिंदे,एस.एस.धसवाडीकर,
ए.बी.कांबळे, रमेश श्रगांरे,रमेश हणमंते,अजय गोडबोले आदीनी प्राचार्य कमलाकर कांबळे यांचे अभिनंदन केले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india