राष्ट्रीय अविष्कार अभियानांतर्गत
उमरगा जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यांतर्गत व राष्ट्रीय अविष्कार अभियानांतर्गत
उमरगा जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यांतर्गत व राज्याबाहेरील दौऱ्यासाठी निवड
तुरोरी दमयंती भालेराव.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत राष्ट्रीय अविष्कार अभियानातून आयएसओ मानांकित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत तालुकास्तरीय तीन लाख व जिल्हास्तरीय पाच लाखाचे बक्षीस मिळवणाऱ्या जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथील सहावी ते आठवीच्या वर्गातील 12 विद्यार्थी व नववीचे आठ विद्यार्थी राज्यांतर्गत पुणे येथील अभ्यास दौरा तर राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी केरळची सफर करणार आहेत सुलतान शानेदिवाण,अथर्व कांबळे, सुभान हन्नुरे,मुस्कान शेख, सृष्टी सूर्यवंशी, रत्नप्रिया चलगिरे, इयत्ता नववी मधील अस्मिता भोसले, पल्लवी पवार, शिवदर्शन शिंदे, आनंद कांबळे, या विद्यार्थ्यांची राज्यातील शाळांच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेली आहे. धाराशिव जिल्ह्यातील शैक्षणिक दृष्ट्या प्रगत शाळेतील विद्यार्थ्यांचे लर्निंग आऊट कम्स सर्वोत्तम असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्या विद्यार्थ्यांना पुणे येथील वैज्ञानिक व शैक्षणिक ठिकाणी मुलांनी भेट दिल्यास विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाणघेवाण, संस्कृती वृद्धीकरण, व आनंददायी शिक्षण प्राप्त करण्यास मदत होईल व विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ होईल यासाठी हा अभ्यास दौरा या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे. या दौऱ्यात विद्यार्थी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क, शनिवार वाडा, लाल महाल, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, राजीव गांधी म्युझिकल पार्क, आयुका सायन्स सेंटर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वेरॉलॉजी, स्वामी नारायण टेम्पल ला भेट देणार आहेत जिल्हा परिषद हायस्कूल मधील 10 विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिका सोनाली मुसळे ह्या दिनांक 11 मार्च ते 13 मार्च दरम्यान पुणे येथील अनेक शैक्षणिक सांस्कृतिक व वैज्ञानिक ठिकाणाला भेट देणार आहेत. शाळेत आधुनिक सुविधा व विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी आणि जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा बनविण्यासाठी व 21 व्या शतकातील इनोव्हेटिव्ह आयडिया विद्यार्थ्यांना माहीत होण्यासाठी हा अभ्यास दौरा उपयुक्त ठरणार असल्याचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी सांगितले. अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे सदानंद शिवदे पाटील अशोक पतगे गटशिक्षणाधिकारी अमोल राजपूत केंद्र प्रमुख शिला मुदगडे व शाळेतील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.
उमरगा .समग्र शिक्षा अभियानांतर्गत राष्ट्रीय अविष्कार अभियानातून आयएसओ मानांकित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत तालुकास्तरीय तीन लाख व जिल्हास्तरीय पाच लाखाचे बक्षीस मिळवणाऱ्या जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथील सहावी ते आठवीच्या वर्गातील 12 विद्यार्थी व नववीचे आठ विद्यार्थी राज्यांतर्गत पुणे येथील अभ्यास दौरा तर राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी केरळची सफर करणार आहेत सुलतान शानेदिवाण,अथर्व कांबळे, सुभान हन्नुरे,मुस्कान शेख, सृष्टी सूर्यवंशी, रत्नप्रिया चलगिरे, इयत्ता नववी मधील अस्मिता भोसले, पल्लवी पवार, शिवदर्शन शिंदे, आनंद कांबळे, या विद्यार्थ्यांची राज्यातील शाळांच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेली आहे. धाराशिव जिल्ह्यातील शैक्षणिक दृष्ट्या प्रगत शाळेतील विद्यार्थ्यांचे लर्निंग आऊट कम्स सर्वोत्तम असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्या विद्यार्थ्यांना पुणे येथील वैज्ञानिक व शैक्षणिक ठिकाणी मुलांनी भेट दिल्यास विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाणघेवाण, संस्कृती वृद्धीकरण, व आनंददायी शिक्षण प्राप्त करण्यास मदत होईल व विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ होईल यासाठी हा अभ्यास दौरा या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे. या दौऱ्यात विद्यार्थी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क, शनिवार वाडा, लाल महाल, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, राजीव गांधी म्युझिकल पार्क, आयुका सायन्स सेंटर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वेरॉलॉजी, स्वामी नारायण टेम्पल ला भेट देणार आहेत जिल्हा परिषद हायस्कूल मधील 10 विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिका सोनाली मुसळे ह्या दिनांक 11 मार्च ते 13 मार्च दरम्यान पुणे येथील अनेक शैक्षणिक सांस्कृतिक व वैज्ञानिक ठिकाणाला भेट देणार आहेत. शाळेत आधुनिक सुविधा व विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी आणि जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा बनविण्यासाठी व 21 व्या शतकातील इनोव्हेटिव्ह आयडिया विद्यार्थ्यांना माहीत होण्यासाठी हा अभ्यास दौरा उपयुक्त ठरणार असल्याचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी सांगितले. अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे सदानंद शिवदे पाटील अशोक पतगे गटशिक्षणाधिकारी अमोल राजपूत केंद्र प्रमुख शिला मुदगडे व शाळेतील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.






