तुळजापूर हुन देवदर्शन करुन हैद्राबादच्या दिशेने वेगाने निघालेल्या कारचे टयर फुटुन दोघांचा जागीच मृत्यू.
उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.
सुसाट कारचे टायर फुटले अन् रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या पानटपरीत घुसली आणी उमरग्याचे माजी नगरसेवकासह भुयार चिंचोली चे उद्योजक या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याने थरकाप उडाला .
उमरगा (जि. धाराशिव) सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (दि. १०) दुपारी साडेतीनच्या सुमारास एका भीषण अपघाताने संपूर्ण उमरगा शहर हादरून गेले. देवदर्शन करून परतणाऱ्या एका भरधाव कारचे टायर फुटल्याने ती थेट रस्त्यालगतच्या चहाच्या टपरीत घुसली.
अपघातात उमरग्याचे माजी नगरसेवक बळीराम पवार यांच्यासह दोघांचा जागीच अंत झाला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
उमरगा ते जकेकूर उड्डाणपुलादरम्यान महादेव देडे यांची पत्रा शेडमध्ये चहाची टपरी आहे. दुपारी माजी नगरसेवक बळीराम कुशाप्पा पवार (४८, रा. उमरगा) आणि लाडनशा गुलाबशा मुर्शद (५२, रा. चिंचोली भुयार) हे टपरीसमोर चहा पीत बसले होते. त्यांच्यासोबत सचिन कुटार आणि हॉटेल चालक महादेव देडे हे देखील होते.
त्याच वेळी हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या (TS 34 F 4706) या कारचे पुढचे उजव्या बाजूचे टायर अचानक फुटले. कारचा वेग प्रचंड असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती कार थेट टपरीसमोर बसलेल्यांच्या लोकांच्या अंगावर आदळलीत्यात दोघाचा जागीच मृत्यू झाल्याची घडल्यानंतर हाहाकार माजलाआणी कार हवेत उडाली आणी लोकांच्या अंगावर कोसळली. या धडकेत बळीराम पवार आणि लाडनशा मुर्शद यांचा जागीच मृत्यू झाला.
सचिन कुटार आणि महादेव देडे गंभीर जखमी झाले असून, सचिन कुटार यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत कार उचलली आणि खाली दबलेल्यांना बाहेर काढण्यात आले.
सदरच्या अपघातात कारच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून तीन-चार दुचाकींचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे कारमधील प्रवाशांना साधे खरचटलेही नाही. अपघातानंतर कारमधील सर्वजण सुखरूप बाहेर पडले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. माजी नगरसेवक बळीराम पवार यांच्या निधनामुळे उमरगा परिसरात मोठी शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.








