Best News Portal Development Company In India

ज्ञानज्योती अभ्यासिकेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सभापती ॲड आकांक्षा चौगुले यांच्या हस्ते सत्कार संपन्न. तुरोरी दमयंती भालेराव!

ज्ञानज्योती अभ्यासिकेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सभापती ॲड आकांक्षा चौगुले यांच्या हस्ते सत्कार संपन्न.
तुरोरी दमयंती भालेराव.
ज्ञानज्योती फाउंडेशन यांच्या वतीने व उमरगा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था, उमरगा यांच्या सहकार्याने उमरगा येथे सुरू असलेल्या ज्ञानज्योती अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा वाचनालय येथील विद्यार्थी इरफान शेख रा.नागराळ ता.उमरगा याची पोलिस उपनिरीक्षक पदी व
ज्ञानज्योती फाउंडेशनचा शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी चि.बलराज पाटील रा.कंटेकुर ता.उमरगा याने चार्टर्ड अकाऊंटन्ट ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल या दोघांचाही ज्ञानज्योती फाउंडेशनचे अध्यक्षा तथा उमरगा पंचायत समितीच्या सभापती ॲड.आकांक्षा चौगुले यांच्या हस्ते सोमवार दि.९ रोजी सत्कार करण्यात आला. आजतागायत या अभ्यासिकेतील २०० पेक्षा जास्त विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल झाले आहेत.

आपल्या भागातील जास्तीत जास्त विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल व्हावेत यासाठी अभ्यासिकेत सर्व सोयीसुविधा मोफत उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटीने अभ्यास करावा. अपयश आले म्हणून खचून न जाता पुन्हा नव्याने तयारी करावी. प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश तुमच्या हातात आहे. कोणत्याही प्रकारची शैक्षणिक मदत लागल्यास हाक द्या आम्ही मदत करू असे आश्वासन ॲड.आकांक्षा चौगुले यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिले.

फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार ज्ञानराज चौगुले, उपाध्यक्ष विजय वडदरे, सचिव प्रदीप मदने, कोषाध्यक्ष अमर देशटवार यांच्या सह ज्ञानज्योती फाउंडेशन आणि शिक्षक पतसंस्था संचालक मंडळाच्या सदस्यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india