SBI कडून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाला ₹२५ लाख किमतीचे ३ LED स्क्रीन भेट
तुळजापूर : State Bank of India (SBI) यांच्या CSR (Corporate Social Responsibility) उपक्रमांतर्गत अंदाजे ₹२५ लाख रुपये किमतीचे ३ अत्याधुनिक LED स्क्रीन Shri Tulja Bhavani Temple येथे देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आले. या उपक्रमामुळे मंदिरात येणाऱ्या हजारो भाविकांना देवी तुळजाभवानीचे दर्शन अधिक सुलभ आणि व्यवस्थितपणे घेता येणार आहे.
मंदिर परिसरात बसविण्यात आलेल्या या LED स्क्रीनच्या माध्यमातून देवीचे थेट दर्शन, मंदिरातील सूचना, कार्यक्रमांची माहिती तसेच भाविकांसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना सहज उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळीही भाविकांना दर्शनाची माहिती स्पष्टपणे मिळण्यास मदत होईल.
या प्रसंगी SBI चे CGM श्री. नंदकिशोर सिंह, GM श्री. अनिरुद्ध कुमार चौधरी, DGM श्री. Y. V. S. S. नागेश्वरराव तसेच डॉ. पद्माकर चांदणे (शाखा व्यवस्थापक, SBI तुळजापूर) उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान तहसीलदार तथा मंदिर संस्थान व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी मंदिर संस्थानतर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी मंदिर लेखाधिकारी संतोष भेंकी, लेखापाल तेजस कराळे तसेच मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी SBI च्या अधिकाऱ्यांनी भविष्यातही भाविकांच्या सोयीसुविधा वाढविण्यासाठी अशा प्रकारचे CSR उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला.







