Best News Portal Development Company In India

पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय धाराशिव यांनी  केलेल्या कामकाजाबाबत माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांची वार्षीक तपासणी!”

पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय धाराशिव यांनी  केलेल्या कामकाजाबाबत माननीय विशेष पोलीस
महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांची वार्षीक तपासणी!”
तुळजापूर प्रतिनिधी ;-  मा. वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर, परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांची धाराशिव जिल्हा पोलीस दलाची वार्षीक तपासणी अनुषंगाने दि.12.03.2026 रोजी सकाळी 10.30 वा. सु. मा. वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर यांनी नियोजीत कार्यक्रमाचे अनुषंगाने पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे वार्षिक तपासणी निमित्त भेट देवून पो.स्टे. धाराशिव ग्रामीण येथील कामकाजाची पाहणी केली. पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथील अधिकारी व अमंलदार यांनी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे परीसराची व इमारतीची स्वच्छता, सुशोभीकरण केले. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे नागरिकांच्या सोयीसुविधा करीता अभ्‌यागत कक्ष, दर्शनीय भागावर सुचना फलक लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनच्या कामकाजाचे अनुषंगाने आढावा घेवून मुद्देमाल कक्ष, शस्त्र व दारुगोळा, कॅश मोहरर, क्राईम मोहरर, यांच्या कामकाजाची व अभिलेख, मुद्देमाल मांडणी व अ,ब, रेकॉर्डची वर्गवारी करुन जुने रेकॉर्ड नाश करणे, बेवारस वाहनांची निर्गती करण्यात आली. पोलीस ठाणे येथील गुन्हे निर्गती, गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण व अर्ज निर्गती, गुन्हे प्रतिबंध,व अभिलेख अदयावत केले याची पाहणी केली. मा.विरेंद्र मिश्र, विशेष पोलीस निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर, यांनी पोलीस अधिकारी, अंमलदार व पोलीस पाटील यांचा दरबार घेवून त्यांच्या अडीअडचणी बाबत विचारपुस केली. तसेच पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे हॉलीबॉल ग्राउंडचे उदघाटन मा.विरेंद्र मिश्र, विशेष पोलीस निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीमती रितु खोखर, पोलीस अधीक्षक, धाराशिव श्रीमती शफकत आमना, अपर पोलीस अधीक्षक, धाराशिव श्री. राउत उपविभागीय पोलीस अधिकारी,  पोलीस निरीक्षक श्री. मोरे, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे उपस्थित होते. तसेच मा.विरेंद्र मिश्र, विशेष पोलीस निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर, यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय धाराशिव  येथे तपासणी दरम्यान सदर कार्यालयाचा व पिंक पथकाचा आढावा घेतला. सदर ठिकाणी परिसराची पाहणी केली

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india