Best News Portal Development Company In India

दि. १२ मार्च २०२६ रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामविकासाला चालना देण्यासाठी ग्रामपंचायत जकेकुरवाडी येथे विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला/उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.

उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.
दि. १२ मार्च २०२६ रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामविकासाला चालना देण्यासाठी ग्रामपंचायत जकेकुरवाडी येथे विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने “महाराष्ट्राची हास्य जत्रा” या लोकप्रिय कार्यक्रमातील अभिनेत्री शिवाली परब
अभिनेता पृथ्वीक प्रताप यांनी जकेकुरवाडी गावाला सदिच्छा भेट दिली. त्यांनी गावाची संपूर्ण पाहणी करून येथे करण्यात आलेली स्वच्छता, सुशोभीकरण व विकासकामे पाहून गावाचे मनापासून कौतुक केले.
यावेळी सरपंच अमर सूर्यवंशी पंचायत सभापती आकांक्षा चौगुले गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड उमरगा पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उमरगा व जकेकुरवाडी परिसरातील लहान-थोर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्वच्छता, सुशोभीकरण आणि ग्रामविकासाच्या कामांमुळे जकेकुरवाडी आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण केली आहे. गावाने केलेल्या या उल्लेखनीय कार्यामुळेच मान्यवर कलाकारांनी गावाला भेट देऊन विशेष कौतुक केले. खरोखरच या गावाचा आदर्श इतर गावांनीही घ्यावा असा आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india