जिल्हा परिषद सदस्या अर्चना युवराज (दाजी) जाधव यांच्याकडून जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांचा सत्कार!
तुरोरी | दमयंती भालेराव.
धाराशिव येथे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षपदी आर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील तर उपाध्यक्षपदी उषाताई रविंद्र गायकवाड यांची दि.१३ रोजी निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.
तुरोरी जिल्हा परिषद मतदार संघातील नवनिर्वाचित सदस्या अर्चना युवराज (दाजी) जाधव यांनी धाराशिव येथे दोन्ही पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचा यथोचित सत्कार करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी खासदार रविंद्र गायकवाड, उमरगा नगराध्यक्ष किरण गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, माजी पंचायत समितीचे उपसभापती युवराज (दाजी) जाधव, हर्षवर्धन चालुक्य आदींची उपस्थिती होती.
नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडीबद्दल उपस्थितांनी अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यानिमित्ताने धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात महिला पर्वाची सुरुवात झाली.






