Best News Portal Development Company In India

निष्काळजीपणे टेम्पो चालवल्याने भीषण अपघात; पश्चिम बंगालच्या तरुणाचा मृत्यू, एक जखमी!         

निष्काळजीपणे टेम्पो चालवल्याने भीषण अपघात; पश्चिम बंगालच्या तरुणाचा मृत्यू, एक जखमी!                  तुळजापूर प्रतिनिधी ;- कासारशिरसी ते उमरगा रोडवर दुधनाळा शिवारात टेम्पो पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुस्तफा बाबामियॉ शेख (रा. अंजली नगर, लातुर) हा आयशर टेम्पो क्र. MH-15-EG-8774 चालवत होता. त्याच्यासोबत काम करणारा साबीर अल्ताफ मालीत्य (वय 24, रा. इलाइट नगर, जि. मुरशिदाबाद, राज्य पश्चिम बंगाल) तसेच इतर कामगार प्रवास करत होते.
दि. 03 मार्च 2026 रोजी सकाळी 07.15 वाजण्याच्या सुमारास दुधनाळा शिवारात कासारशिरसी ते उमरगा जाणाऱ्या रस्त्यावर चिंचनसुरे यांच्या शेताजवळ चालकाने टेम्पो अत्यंत वेगात व निष्काळजीपणे चालवून रस्त्यावरील खड्यात टाकला, त्यामुळे टेम्पो रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन पलटी झाला.
या अपघातात निलेश साबीर मालीत्य गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला, तर फिर्यादी रबिंदर सनातन सिंग (वय 23, रा. बालीमुंडी पोस्ट नागाडीपाडा बेलागैरी, ता. जि. बालीगीरा पुरबा मैदनीपुर, पश्चिम बंगाल, सध्या लेबर कॅम्प कासा शिरसी, ता. निलंगा, जि. लातुर) हे गंभीर जखमी झाले. असे सांगण्यात आले.
याबाबत फिर्यादी रबिंदर सनातन सिंग यांनी दि. 14 मार्च 2026 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून उमरगा पोलीस ठाण्यात आरोपी मुस्तफा बाबामियॉ शेख याच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम 281, 125 (अ), 125 (ब), 106 (1) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. असे अपघात रोखण्यासाठी रस्ते दुरुस्तीकडे ही शासनाने लक्ष दिले पाहिजे अशी चर्चा आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india