डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्थेचा हिशोब पारदर्शक असला तर जनतेचा विश्वास वाढून धम्माचे काम अधिक गतीशील येईल -ॲड एस के भंडारे
केंद्रीय ऑडीटर कार्यशाळा उत्साहात संपन्न
उमरगा/ लोहारा आदिनाथ भालेराव.
दि १६ बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली बौद्धांची शिखर संघटना असून त्याचे संचालन आंबेडकर परिवार करीत आहे, यामुळे डॉ बाबासाहेबांची जनता धम्मदान देतात म्हणून संस्थेचा हिशोब पारदर्शकतेने लिहून जनतेला ऑडिट अहवाल दिला पाहिजे तरच जनतेचा आपल्यावरील विश्वास वाढून धम्माचे काम अधिक गतिशील होईल असे प्रतिपादन उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक , केंद्रीय ऑडिट कमिटीचे प्रमुख/ ट्रस्टी ॲड एस के भंडारे यांनी केंद्रीय कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय ऑडीटर कार्यशाळा दि. १५ मार्च २०२६रोजी डॉ.आंबेडकर भवन दादर मुंबई येथे केले . ॲड भंडारे यांनी हिशोबाची कार्यपद्धती व कॅश बुक, पिटी कॅश बुक (शिबिर/कार्यक्रम जमा खर्च बुक),जमा खर्च अहवाल, भरणा पावती, व्हावचर इत्यादी कसे कसा लिहावे व त्याबाबत विचारलेल्या शंकांचे समाधान केले. केंद्रीय ऑडिट सदस्य व राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड गुरुजी यांनी तिमाही प्रगती अहवाल कसा लिहावा यावर मार्गदर्शन केले , केंद्रीय ऑडिट कमिटी उपप्रमुख व राष्ट्रीय सचिव ॲड डॉ वानखडे यांनी वार्षिक अहवाल, वैयक्तिक जमाखर्च डायरी कसा लिहावा व हिशोबाची सराव परीक्षा घेतली, केंद्रीय ऑडिट कमिटी सदस्य रुपेश तामगावकर यांनी ऑडिटर हा मित्र आहे त्याभिमिकेतून त्याने कसे काम करावे, बँक रिकंशीलेशन इत्यादी बाबत मार्गदर्शन केले .शेवटी ॲड एस के भंडारे यांनी केंद्रीय ऑडिट कमिटीच्यावतीने असे जाहीर केले की, माजी पदाधिकारी यांनी आपल्या कार्यकातील जमाखर्च अहवाल देणे बंधनकारक आहे त्यांना त्यांच्या हिशोब लिहिण्यात काय अडचणी असतील तर त्यांनी ऑडिट कमिटीशी संपर्क करून आपला जमा खर्च अहवाल येत्या तीन महिन्यात पूर्ण करावा, केंद्रीय कमिटीच्या वतीने घेण्यात आलेल्या विशेष परीक्षेत पास होतील त्यांना ऑडिटर म्हणून सन्मानित करण्यात येऊन त्यांना विविध राज्य/प्रदेश, जिल्हा /झोन, तालुका/शहर शाखांचा तिमाही ऑडिट करण्यासाठी नियुक्ती केली जाईल असे जाहीर केले. कार्यशाळेतील राज्य पदाधिकारी यांनी मागणी केल्यानुसार वर्षातून एक ऑफलाईन व एक ऑनलाईन ऑडिटर कार्यशाळा घेण्यात येईल आणि प्रत्येक राज्य/प्रदेश शाखेत आणि महाराष्ट्राच्या सात विभागात विभागीय हिशोबाची कार्यशाळा घेण्यात येईल. या ऑडिटर कार्यशाळेत देशभरातील महाराष्ट्र (पुरुष/महिला), मुंबई प्रदेश(पुरुष/महिला), दिल्ली,कर्नाटक(पुरूष/महिला), मध्यप्रदेश तेलंगणा, हैदराबाद या राज्यातील विविध जिल्ह्याचे कोषाध्यक्ष, ऑडिटर व हिशोबाचे जाणकार आणि केंद्रीय व केंद्रीय विभागाचे पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
या कार्यशाळेत मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रशिक्षण देण्यात आले. शेवटी मुंबई प्रदेशचे उपाध्यक्ष विलास ढोबळे यांचा वाढदिवस असल्याने त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यशाळेचे सूत्रसंचालन ॲड डॉ एस एस वानखडे यांनी केले तर राष्ट्रीय कोषाध्यक्ष सी.बी. तेलटुंबडे यांनीआभार मानले. सरनतय घेऊन सांगता करण्यात आली.






