Best News Portal Development Company In India

जळकोटला आवकाळी पाऊसाने झोडपले रस्त्यावर गाराचा खच तर गावातील गटारी तुंबल्याने रस्त्यावर पाणी ! अरुण लोखंडे जळकोट.

जळकोटला
आवकाळी पाऊसाने झोडपले
रस्त्यावर गाराचा खच तर गावातील गटारी तुंबल्याने रस्त्यावर पाणी
– – – – – – – – – – – – – – – – – – – –
जळकोट (अरुण लोखंडे) तुळजापूर तालुक्यातील जळकोट आणि परिसरात वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकारासह अवकाळी पावसाने झोडपले असून पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे .

याबाबत प्राप्त माहिती अशी की हवामान खात्याने वर्तवालेल्या अंदाज आज रोजी खरा ठरला आहे दि १७ रोजी धाराशिव जिल्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडासह पाऊस पडेल असा इशारा दिला होता आणि तो खरा ठरला जळकोट येथे सायकांळी सहा वाजता पाऊसाने सुरूवात केली ते तबल एक तास गारा आणि पाऊस झाला आहे तर वादळ आणि सोसाट्याचा वारा विजाचा कडकडाट पाऊस पडला आहे . संपूर्ण रस्त्यावर गाराचा खच पडला होता बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतातील काढणीला आलेल गहू हरभरा ज्वारी बागायतदार जमीनदारांच्या शेतीतील द्राक्षाच्या बाग आणि आंबे आदी फळबागाचे भयानक नुकसान झाल्याचे चित्र सदया जळकोट आणि परिसरात पहायास मिळत आहे . निर्सगाने दिले आणि निर्सगानेच नुकसान केले म्हणण्याची वेळ शेतकरी राजावर आली आहे सदरच्या गारपिटाने सर्व पिकांचे फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने त्वरीत शेतकऱ्याच्या बांधावर जावून नुकसान झालेल्या पिकांचे व बागातदारांचे बागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक साह्य करून नुकसान भरापाई द्यावी अशी मागणी शेतकरी बांधवातून होत आहे

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india