.डॉ.आंबेडकर जयंती उत्सव कमिटी आरळी (बु.) च्या अध्यक्षपदी राहुल सोनवणे यांची निवड.
—————————————————–
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी आरळी (बु.) ता.तुऴजापूर च्या अध्यक्षपदी येथील युवा कार्यकर्ते राहुल भीमराव सोनवणे यांची एकमताने निवड करण्यात आली.
. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्ताने तुळजापूर तालुक्यातील भीमगर्जना तरुण मंडळ आरळी (बु) ची एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली असून या बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या आनंदाने व विविध उपक्रमाने साजरा करण्याचे ठरले.यावेळी सर्वानुमते चर्चा करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीची निवड करण्यात आली ती पुढील प्रमाणे अध्यक्ष राहुल सोनवणे,उपाध्यक्ष राम साबळे,खजिनदार विलास सोनवणे,मिरवणूक प्रमुख किरण गायकवाड,दिगंबर गायकवाड,रवी सोनवणे,लखन साबळे,तेजस सोनवणे,गणेश बनसोडे,नेताजी सोनवणे, आदींची एकमताने निवड करण्यात आली.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्ताने निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण समाज प्रबोधनपर भीम गीत गायन,व्याख्यान सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून गावातून मुख्य रस्त्यावरून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढून या जयंती उत्सवाची सांगता करण्यात येणार असल्याची माहिती जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांनी दिली.याप्रसंगी भीमगर्जना तरुण मंडळाचे सर्व सदस्य पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.






