मध्यवर्ती जयंती उत्सव कमिटी नळदुर्गच्या अध्यक्षपदी सुरज कांबळे यांची निवड
——————————————————–
नळदुर्ग ( एस.के.गायकवाड ):
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव कमिटी नळदुर्ग ता.तुळजापूरच्या अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते सुरज कांबळे यांची बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली.
. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्ताने नळदुर्ग येथील बुद्ध विहाराच्या प्रांगणात आंबेडकरी अनुयायांची एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली असून त्या बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव कमिटी नळदुर्ग ची निवड करण्यात आली ती पुढील प्रमाणे अध्यक्ष सुरज कांबळे, कमिटीचे सन्माननीय सदस्य म्हणून अमर बनसोडे, दिलीप भांगे, योगेश प्रकाश बनसोडे, प्रशांत कांबळे,संतोष कांबळे आदींची निवड करण्यात आली तर जयंती उत्सव नियोजन समितीचे सदस्य म्हणून न.प.गटनेते मारुती खारवे रिपाइं(आठवले) चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर,अँड.अभिजीत बनसोडे व ओमप्रकाश बनसोडे आदींची निवड करण्यात आली.
प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे यांच्या मार्गदर्गनाखाली सामुदायिक रित्या बुद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी सिद्धांत बनसोडे, राजरत्न बनसोडे,ऋषिकेश कांबळे,योगेश सुरवसे,अमोल कांबळे,योगेश दुरुगकर,प्रणाल गवळी,धम्मसागर बनसोडे, विश्वास बनसोडे,शैलेश बनसोडे साहिल बनसोडे,अमोल सुरवसे सह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






