एच.पी.व्ही. लसीकरण मोहिमेचे बापुराव पाटील यांच्या शुभहस्ते उदघाट्न..
गर्भाशयाच्या मुखाला होणाऱ्या कर्करोगला रोखण्यासाठी लसीचे मदत होते – डॉ. महेश अर्धाले
एचपीव्ही लसीकरण मोहिमेचे नगराध्यक्ष बापुराव पाटील यांच्या हस्ते उदघाटन
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयात दि. २० वार शुक्रवार रोजी HPV लसीकरण मोहिमेचे मुरूम नगरीचे नगराध्यक्ष बापुराव पाटील यांच्या हस्ते आरोग्य देवता धनवंत्री पूजन व द्विप्रज्वलनाने उदघाटन संपन्न झाले.याप्रसंगी उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण,पंचायत समिती माजी सभापती मदन पाटील, गोविंद पाटील, माजी नगराध्यक्ष बबन बनसोडे,नगरसेवक गणेश अंबर,नगरसेवक अजित चौधरी,वैधकीय अधीक्षक डॉ. महेश अर्धाले,डॉ. शिवराज कारडामे, डॉ. नितीन डागा, डॉ. महेश जिरोळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी माहिती देताना डॉ. अर्धाले म्हणाले HPV लस सण २०१० पासुनच वापरात असून त्या लसीपासून कोणतेही धोका नसून त्याबाबत समाजमाध्यमावर अफवा पसरविण्यात येत आहेत. गर्भशयाच्या मुखाला होणाऱ्या कर्करोगाला थांबविण्यासाठी या लसीचे मदत होते. HPV ही मानवी पॅपिलोमाव्हायरस संसर्गापासुन संरक्षण करणारी एक अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी लस आहे, जी प्रामुख्याने गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगास कारणीभूत ठरू शकते. १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी ही लस सर्वोत्तम मानली जाते. ही लस लैंगिक क्रिया सुरु होण्यापूर्वी घेतल्यास सर्वाधिक संरक्षण मिळते. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून बचावासाठी हा एक अत्यंत महत्वाचा प्रतिबंधात्मक उपाय असल्याचे माहिती लसी संदर्भात मनामध्ये कसलीही शंका न बाळगता लसीकरण करून घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी नगराध्यक्ष बापुराव पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयातील डायलसिस सेंटर, रुग्णालयाची पाहणी केली.मुरूम शहरातील डॉक्टर असोसिएशन, पत्रकार बांधव, ग्रामीण रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित जाधव तर आभार विजय भोसले यांनी मानले.






