Best News Portal Development Company In India

जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर शंकरने मिळविले यश आंबेवाडीचा सुपुत्राची धाराशिव पोलीस दलात निवड !

जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर शंकरने मिळविले यश

आंबेवाडीचा सुपुत्राची धाराशिव पोलीस दलात निवड

धाराशिव : तालुक्यातील आंबेवाडी येथील शंकर इंगळे या युवकाने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले आहे. त्याची धाराशिव पोलीस दलात निवड झाली आहे. अत्यंत साध्या व सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या शंकरने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश मिळवले असल्याने परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शंकरचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच झाले. लहानपणापासूनच पोलीस दलात भरती होण्याचे त्याचे स्वप्न होते. या स्वप्नासाठी त्याने नियमित धावणे, व्यायाम, लेखी परीक्षेचा अभ्यास यावर विशेष लक्ष केंद्रित केले. अनेक अडचणी, अपयश आणि आर्थिक परिस्थितीची अडचण असूनही त्याने हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले. त्याच्या मेहनतीचे फळ म्हणून अखेर त्याची धाराशिव पोलीस दलात निवड झाली.

शंकरच्या या यशामुळे आंबेवाडी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थ, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. अनेकांनी त्याचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, शंकरने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक व मित्रांच्या पाठिंब्याला दिले आहे. “जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर कोणतेही यश मिळवता येते,” असे मत शंकरने व्यक्त केले. त्याच्या यशामुळे परिसरातील तरुणांना प्रेरणा मिळत असून आंबेवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india