कास्ती बुद्रुक येथे संविधानावर प्रबोधनपर व्याख्यान संपन्न; बोध उपासक व समता सैनिक दलाचा मोठा सहभाग !
तुळजापूर (प्रतिनिधी):
तालुक्यातील कास्ती बुद्रुक येथे भारतीय संविधानाप्रती जनजागृती आणि प्रबोधन करण्याच्या उद्देशाने एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षक राजकुमार गजधाने सरांनी उपस्थितांना संविधानाचे महत्त्व आणि मानवी जीवनातील त्याची भूमिका यावर मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भीम नगरमधील उपस्थित बोध उपासक, उपासिका आणि समता सैनिक दलाच्या वतीने पाहुण्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) तालुका अध्यक्ष काकासाहेब भंडारे यांच्या हस्ते राजकुमार गजधाने सरांचा सत्कार करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
आपल्या व्याख्यानात बोलताना राजकुमार गजधाने यांनी संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव करून दिली. ते म्हणाले की, “संविधान केवळ एक पुस्तक नसून तो आपल्या प्रगतीचा मार्ग आहे. प्रत्येकाने संविधानाचा अभ्यास करून त्यातील मूल्यांचे जतन करणे हीच खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली ठरेल.” संविधानामुळेच उपेक्षितांना सन्मानाने जगण्याची संधी मिळाली असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीम नगरमधील समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास खालील मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
प्रशांत भंडारे,मुकेश भंडारे,दादा भंडारे,आर्यन भालेराव,अजिंक्य भंडारे,विकी भंडारे .
यासोबतच भीम नगरमधील अनेक बोध उपासक आणि उपासिका यांनी या वैचारिक मेळाव्यात सहभाग नोंदवून संविधानाप्रती आपली निष्ठा व्यक्त .
कास्ती बुद्रुक येथे झालेल्या या व्याख्यानामुळे स्थानिक युवकांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये संविधानाविषयी नवी दृष्टी निर्माण झाली आहे. अशा कार्यक्रमांतूनच समाजातील एकता आणि समता टिकवून ठेवण्यास मदत होते, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्या

त आली.






