Best News Portal Development Company In India

मुलींनी एच पी व्ही लस घेऊन कॅन्सर मुक्त व्हावे . तुरोरी दमयंती भालेराव.

मुलींनी एच पी व्ही लस घेऊन कॅन्सर मुक्त व्हावे .
तुरोरी दमयंती भालेराव.
सभापती अँड आकांक्षा चौगुले
उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे एच पी व्ही लसीकरणाबद्दल जनजागृती अभियानात पंचायत समिती सभापती अँड आकांक्षा चौगुले बोलत होत्या यावेळी गटशिक्षणाधिकारी अमोल राजपूत विस्तार अधिकारी शिला मुदगडे मुख्याध्यापक पद्माकर मोरे डॉक्टर बनसोडे उपस्थित होते. पुढे बोलताना अँड आकांक्षा चौगुले म्हणाल्या की आज भारत कर्करोगामध्ये जगात दुसऱ्या नंबर वर आहे अशा या अतिशय गंभीर आजाराला कायमचे नाहीसे करण्यासाठी १४वर्षे पूर्ण झालेल्या जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथील विद्यार्थिनींनी एच पी व्ही लसीकरण करून घ्यावे व भविष्यात मुलींना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ नये याची काळजी घ्यावी. पालकांनीही या लसी संदर्भात जनजागृती करून सर्व मुलींना लसीकरण करण्यासाठी सहकार्य करावे असे आव्हान केले यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर बनसोडे विस्ताराधिकारी शीला मुदगडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी अमोल राजपूत यांनी तर सूत्रसंचालन मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी केले कार्यक्रमाचे आभार प सोनाली मुसळे यांनी मानले
कार्यक्रमासाठी उपजिल्हा रुग्णालयातील शेख मॅडम, व प्रशालेतील सर्व शिक्षक पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india