Best News Portal Development Company In India

राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने मारुती बनसोडे सन्मानित !

राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने मारुती बनसोडे सन्मानित
———————————————————
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या वतीने सन 2020- 21 ते 24 -25 या कालावधीतील पाच वर्षाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराचे दि.26 मार्च 2026 रोजी मुंबईत वितरण करण्यात आले.या.प्रसंगी नळदुर्ग ता. तुळजापूर येथील परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे यांना सन 2023 •24 यावर्षीचा राष्ट्रपिता महात्मा गांधी राजस्त्रीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ऍड .राहुल नार्वेकर,केंद्रीय सामाजिक न्याय व आधिकातता राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब , सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र शासन मा. ना. संजय शिरसाट, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे , समाज कल्याण संचालक डॉ. दीपा मुधोळ – मुंडे,आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी राज्यातील एकूण 100 व्यक्ती आणि 13 संस्थांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यात धाराशिव जिल्ह्यातून एकमेव मारुती बनसोडे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, शाल,आणि रोख 15000 रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
मारुती बनसोडे हे गेली तीन चार वर्षे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे धाराशिव जिल्हा संघटक म्हणून काम करीत आहेत. जिल्ह्यातील अनेक शाळा, कॉलेज मध्ये जाऊन ते प्रबोधनाचे काम करीत आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेवून त्याना सदर पुरस्काराने समानीत करण्यात आले असून सदर पुरस्कार त्याना मिळाल्या बदल
जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तीकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india