“उमरगा येथील सारनाथ बौद्ध विहार पंच कमिटीच्या जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्षपदी बालाजी सुरवसे तर उपाध्यक्षपदी सहदेव जी सोनकांबळे यांची निवड”. उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.
दि,२५ उमरगा येथील सारनाथ बौद्ध विहार कमिटीच्या कार्यकर्त्यांची एक बैठक होऊन त्या बैठकीत विश्वभूषण, बोधिसत्व, डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बालाजी सुरवशे तर उपाध्यक्षपदी सहदेव जी सोनकांबळे या धडाडीच्या कार्यकर्त्याची एकमुखी निवड झाली आहे याचवेळी सचिव पदी जीवन सरपे तर खजिनदार पदी आकाश सरपे यांची निवड झाली आहे १४ एप्रिल रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात येऊन कार्यक्रमाची जयत तयारी चालू झाली आहे,११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीचे आयोजन केले असून यासाठी प्रमुख पाहुण्या व वक्त्या म्हणून प्राध्यापिका अनिता लोंढे सरपे ह्या व्याख्यान देणार आहेत, १२ एप्रिल रोजी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन केले आहे, १३ एप्रिल रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे या तिन्ही स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय, तृतीय पारितोषिकाचे वितरण करण्यात येणार आहे, या बैठकीसाठी सिद्धार्थ सोनकांबळे, दिनेश सरपे, सचिन कांबळे, मैत्री दीप कांबळे, समर्थ सोनकांबळे, प्रबुद्ध सरपे, अनिकेत सर पे, अशोक सर पे, रत्नदीप भालेराव, अनिकेत सर पे, अशोक सर पे, प्रशांत कांबळे अनेक तरुण मंडळी, बौद्ध उपासक, ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते, १४ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता ध्वजारोहण होऊन, गावातील प्रमुख मार्गावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे भव्य मिरवणुकीचे आयोजन केले आहे तरी सर्व बौद्ध प्रेमी मंडळींनी या मिरवणूक साठी उपस्थित राहावे असे आव्हान जयंती कमिटीच्या वतीने केले आहे






