श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर येथील सुरक्षा कर्मचारी सौ. सवीता चव्हाण यांची कर्तव्यदक्षता आणि प्रामाणिकपणा ! तुळजापूर प्रतिनिधी :- भाविकांची हरवलेली पर्स सुरक्षारक्षकांनी प्रामाणिकपणे परत केली
श्री तुळजाभवानी मंदिर येथे शनिवार, दि. 28 मार्च रोजी सकाळी एक उल्लेखनीय प्रामाणिकतेचा आणि कर्तव्यदक्षतेचा प्रकार घडला.
भाविक मंगल शशिकांत कबाडे (रा. जुन्नर पाडळी) हे देवीचे दर्शन घेण्यासाठी आले असता गर्दीमध्ये त्यांची पर्स हरवली. संबंधित पर्स सिंहांचा गाभारा परिसरात कार्यरत SISPL सुरक्षारक्षक सौ. सविता चव्हाण यांना आढळली.
सौ. चव्हाण यांनी तत्परता दाखवत ती पर्स त्वरित दर्शन मंडप नियंत्रण कक्षात जमा केली. त्यानंतर भाविकांची ओळख पटवून संबंधित पर्स त्यांना परत करण्यात आली.
सदर पर्समध्ये अंदाजे रु. ४,५९०/- रोख रक्कम तसेच महत्त्वाची कागदपत्रे होती. सुरक्षारक्षक सौ. सविता चव्हाण यांच्या या प्रामाणिक व जबाबदार कृतीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी सहायक सुरक्षा निरीक्षक प्रतीक दिवाणजी, श्रीकांत पवार तसेच SISPL सुरक्षा निरीक्षक योगेश फडके व इतर सुरक्षारक्षक उपस्थित होते.
कालच स्वच्छता कर्मचारी यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा आणि आजची घडलेली ही घटना याची साक्ष देते की तुळजापूर मंदिर संस्थांमधील कर्मचारी कार्यतत्पर असून प्रामाणिक ही आहेत.
त्यांच्या हातून श्री आई तुळजाभवानी च्या भाविक भक्तांची अशीच निरंतर सेवा घडत राहो. हीच प्रार्थना.






