उमरग्यात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन घरे फोडून सव्वा लाखांचा ऐवज लंपास!
तुळजापूर (प्रतिनिधी):
उमरगा तालुक्यातील बोरी येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घरांचे कडी-कोंडा तोडून दोन ठिकाणी धाडसी चोरी केली आहे. यात सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण १ लाख ३० हजार २५० रुपयांचा माल लंपास केला असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बोरी येथील रहिवासी निळकंठ तानाजी फत्तेपुरे (वय ३६ वर्षे) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. दि. २६ मार्च रोजी रात्री २३:३० ते २७ मार्च रोजी पहाटे ०२:०० वाजेच्या सुमारास, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील १५ ग्रॅम वजनाचे
एवढ्यावरच न थांबता, चोरट्यांनी शेजारीच असलेल्या आत्माराम दशरथ होळकर यांचेही घर फोडले. त्यांच्या घरातून ५० हजार रुपयांची रोख रक्कम पळवून नेली. दोन्ही ठिकाणची चोरी मिळून एकूण १,३०,२५० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.
याप्रकरणी फिर्यादी निळकंठ फत्तेपुरे यांनी २७ मार्च रोजी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४) आणि ३०५ (अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी चक्रे फिरवली आहेत. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी.
महत्त्वाची सूचना: नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहावे आणि आपल्या घराबाहेर किंवा परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रशासन सतर्क आहेच पण नागरिकांनीही सावधगिरी बाळगण्याची अत्यंत गरज आहे.






