Best News Portal Development Company In India

पैठण येथे सम्राट शालिवाहन राजांची जयंती उत्साही वातावरणामध्ये साजरी. . उमरग्याचे उद्योजक तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष अ.भा.प्र.कुंभार महासंघ दिल्ली. नागनाथ(अप्पा )कुंभार यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती.

पैठण येथे सम्राट शालिवाहन राजांची जयंती उत्साही वातावरणामध्ये साजरी.
.
उमरग्याचे उद्योजक तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष अ.भा.प्र.कुंभार महासंघ दिल्ली. नागनाथ(अप्पा )कुंभार यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती.
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

श्री क्षेत्र पैठण येथे.. दि.२८ शनिवारी पैठण तालुका समस्त कुंभार समाज संघटनेच्या वतीने शककर्ता सम्राट राजा शालिवाहनांची जयंती चैत्र शुद्ध दशमी ला मोठ्या उत्साही वातावरणामध्ये साजरी करण्यात आली.. यावेळी महाराष्ट्रातुन शेकडो कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झाले होते …
जुन्या पैठण मधील विजयी तिर्थ स्तंभ उद्यानात कार्यकर्त्यांनी राजा सम्राट शालिवाहनांच्या प्रतिमेस पुष्पवृष्टी करून अभिवादन केले…
शालिवाहनांच्या जयजयकाराने परिसर दुमदुमुन गेला… झेंडूजी महाराज मठात संपन्न झालेल्या कार्यक्रमात राज्यभरातुन आलेल्या कार्यकर्त्यांनी सम्राट शालिवाहनांच्या कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले…
यावेळी. तुषार पाटील उपनगराध्यक्ष,श्री संजय जोरले, रामदास इंगळे, उमरग्याचे उद्योजक तथ अखिल भारतीय प्रजापती कुंभार महास़घ दिल्ली राष्ट्रीय उपाध्यक्ष नागनाथ(अप्पा )कुंभार, शामराजे कुंभार, दत्ताजी डहाळसकर, खटावकर, जालिंदर पंजावाले, गणेश पंजावाले, सुर्यभान घोडके, निवृत्ती जाधव, गणेश रोकडे, मनोहर तांगडे, मुरलीधर तिडके, मनोहर मरकड, साखरचंद जाधव, यांची भाषणे झाली..
महाराष्ट्र शासनाने पैठणच्या बसस्थानकाला सम्राट शालिवाहन यांचे नाव देण्यात यावे, तसेच जुन्या पैठण मधील केंद्र सरकार च्या ताब्यात असलेल्या पालथी नगरीचा तात्काळ विकास करण्यासाठीची कार्यवाही करण्यात यावी आदि मागण्या करण्यात करण्यात आल्या..
कार्यक्रम यशस्वी करणे साठी भाऊसाहेब पंजावाले, सतिष दळे, राम पंजावाले, साहेबराव रोकडे, प्रमोद पंजावाले, भागवत रोकडे, रवी पंजावाले, विठ्ठल रोकडे, अजय पंजावाले, अशोक रोकडे, कल्याण पंजावाले, अंबादास अंबादास रोकडे, पंढरीनाथ खळदकर, प्रकाश शिर्के, कडुबा शिर्के विठ्ठल मरकड…. आदिंनी परिश्रम घेतले….
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली..

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india