राज्यस्तरीय शालेय तेंग सु डो स्पर्धेत
उमरगा जिल्हा परिषद हायस्कूलने केली चौदा पदकाची कमाई.
चार सुवर्ण चार रौप्य सहा कांस्य पदक
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद हायस्कूलला राज्यस्तरीय शालेय तेंग सु डो स्पर्धेत चार सुवर्ण चार रजत आणि सहा ब्राँझ पदक मिळाले आहेत या स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, बुलढाणा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,तेंग सु डो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदुरा बुलढाणा येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये राज्यभरामधील आठ विभागातील १४,१७ व १९वयोगटातील एकूण ४५०खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वजन गटामध्ये १४पदके मिळवून दबदबा निर्माण केला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सह दिवाणी न्यायाधीश सौ जी पी बनकर, विधीज्ञा सौ.एफ के खान विधीज्ञा यु आर शेंडगे अपचे मॅडम शिक्षण तज्ञ सदानंद शिवदे पाटील मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन सत्कार करण्यात आला त्यामध्ये आनंदी कांबळे मोहिनी घोडके अश्विनी जाधव ईश्वरी माने,या विद्यार्थीनीना सुवर्ण पदक, सृष्टी सूर्यवंशी, स्नेहल कांबळे, इस्माईल नदाफ, शिवदर्शन शिंदे, यांना रजत पदक तर गीता गायकवाड, प्रीती मेढे, श्रेयशी शिंदे, अफसाना नदाफ,वैष्णवी कोळनुरे,आदित्य पांडे या विद्यार्थ्यांनी ब्राँझ पदकाची कमाई केली या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक महंमद रफी शेख जिल्हा परिषद हायस्कूल मधील फजल शेख, धनराज तेलंग,यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे मोठे यश प्राप्त केलेले आहे. लातूर विभागाचे प्रतिनिधित्व करत असताना शंभर टक्के पदकाची ऐतिहासिक कामगिरी नोंदवली व पदक तालिकेमध्ये महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी ही शाळेने पटकावली. या यशाबद्दल अशोक पतगे अमर वरवटे सदानंद शिवदे पाटील सुजाता मोरे गटशिक्षणाधिकारी अमोल राजपूत विस्तार अधिकारी शिला मुदगडे , बशीर शेख विद्यानंद सूत्रावे सदानंद कुंभार संजय रुपाजी नागेश स्वामी प्रवीण शिंदे सोनाली मुसळे भाग्यश्री पंडित वर्षाराणी पाटील व शाळेतील इतर सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले यावेळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







