Best News Portal Development Company In India

देशातील अग्रगण्य व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या नवभारत टाईम्स, दिल्ली या वृत्तसंस्थेतर्फे दिला जाणारा *“उत्कृष्ट शिक्षण संस्था पुरस्कार”* आपल्या उमरगा येथील *“श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळ”* या संस्थेला आज *छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र* येथे प्रदान करण्यात आला!

उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
देशातील अग्रगण्य व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या नवभारत टाईम्स, दिल्ली या वृत्तसंस्थेतर्फे दिला जाणारा *“उत्कृष्ट शिक्षण संस्था पुरस्कार”* आपल्या उमरगा येथील *“श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळ”* या संस्थेला आज *छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र* येथे प्रदान करण्यात आला.

हा मानाचा पुरस्कार *महाराष्ट्र राज्याचे अक्षय ऊर्जा व दुग्धविकास मंत्री मा. ना. अतुलजी सावे व आमदार श्री. विक्रमजी काळे यांच्या हस्ते श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. श्री. रामकृष्णपंत खरोसेकर यांना भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला. यावेळी आदर्श वरिष्ठ महाविद्यालयाचे *प्रभारी प्राचार्य डॉ. श्री. राम सोलनकर, श्रमजीवी कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य श्री. राम पेठकर* व तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

१० सप्टेंबर १९८४ रोजी स्थापन झालेल्या या संस्थेने अत्यंत उल्लेखनीय व गौरवास्पद कामगिरी केलेली आहे. या पुरस्कारामुळे संस्थेच्या कार्यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

या उल्लेखनीय यशाबद्दल *संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. विनायकराव पाटील व सरचिटणीस, माजी मंत्री मा. श्री. बसवराज पाटील यांनी प्राचार्य तसेच सर्व कर्मचारी वर्गाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india