भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुरुम शहरात ठेवण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेचे शरण पाटील यांच्या हस्ते उद्घाटन.
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उमरगा तालुक्यातील मुरूम शहरात भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे स्पर्धेचे उद्घाटन शरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या अंगी असलेल्या खेळाडूवृत्तीला योग्य मंच मिळावा यासाठी अशा क्रीडा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या भव्य क्रिकेट स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची ठेवण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल सर्व आयोजकांचे शरण पाटील यांच्या वतिने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
या उद्घाटन सोहळ्यास क्रीडा अधिकारी मदन गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य अप्पासाहेब पाटील, नगरसेवक रूपचंद गायकवाड, विश्वभूषण लिमये, नगरसेवक सुजित शेळके, नगरसेवक राजू मुल्ला, नगरसेवक राजकुमार अंबुसे, निर्मल निमये, अमोल बनसोडे, किरण गायकवाड, अभिषेक कांबळे, यशपाल कांबळे,सर, आनंद गायकवाड,मंगेश कांबळे, किशनकुमार कांबळे, महेबूब मासूलदार, जिंदावली सन्नाटे, मुस्तफा बालकुंदे, मुन्ना मासूलदार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.








