जळकोट येथील ग्रामदैवत बाबनावली उरूसानिमित्त रंगला कव्वाली मुकाबला…
– – – – – – – – – – – – – – – – – – – –
जळकोट; ( अरुण लोखंडे )
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील ग्रामदैवत हजरत ख्वाजा सय्यद मुबारक शहावली उर्फ बाबनावली यांच्या उरूसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह शाहनदार कव्वालीचा मुकाबला रंगला होता. हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या ग्रामदैवत हजरत ख्वाजा सय्यद मुबारक शहावली उर्फ बाबनावल्ली यांच्या उरूसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये दर्गाह व परीसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच पाळणे,खळणी , स्टेशनरीसह अनेक दुकाने थाटली होती.तिन दिवसीय यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.यामध्ये सोमवार (दि.30)रोजी गावातून संदल मिरवणूक काढण्यात आली.तर मंगळवार (दि.31)चिरग रोशनाई करण्यात आली.त्यानंतर रात्री पुणे येथील प्रसिद्ध कव्वाल तोसिफ जुनौद्दी आणि नगर येथील गुलझार निजामी यांचा शानदार कव्वालीचा मुकाबला रंगला होता.या कव्वाली कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती सिध्देश्वर कोरे, पंचायत समितीच्या उपसभापती रोहिणी मेलगीरी, पंचायत समिती सदस्य भिवा इंगोले,माजी जिप सदस्य गणेश सोनटक्के, प्रकाश चव्हाण, पंचायत समिती सदस्य आशिष सोनटक्के,भाजपा मंडळ अध्यक्षा रंजना राठोड,सरपंच गजेंद्र पाटील, ,माजी सरपंच अशोक पाटील,कृष्णात मोरे,महेश कदम, यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच बुधवार (दि.01)रोजी सकाळी जिरायत फातियाॅखानी व महाप्रसाद वाटपाने उरूसाची सांगता झाली. जळकोटसह पंचक्रोशितील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








