Best News Portal Development Company In India

नंदगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी अध्यक्ष पदी शाम नागिले तर उपाध्यक्ष पदी विशाल मुकदान यांची निवड !

नंदगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी अध्यक्ष पदी शाम नागिले तर उपाध्यक्ष पदी विशाल मुकदान यांची निवड
—————————————————–
नळदुर्ग (एस.के.गायकवाड): तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे विश्वरत्न भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जंयत्ती निमीत्त संयोजन समिती गठीत करण्यात आली असून या जयंती उत्सव कमिटीच्या अध्यक्ष पदी शाम नागिले यांची तर उपाध्यक्ष पदी विशाल मुकदान यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नंदगाव गावचे सरपंच शशिकांत नागिले हे होते तर ब्रह्मानंद माने व पंढरी सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन करून सामुदीयीक त्रिशरण पंचशिल घेण्यात आले.
. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त चार जनाची समिती गठीत करण्यात आली, यामध्ये अध्यक्ष शाम नागिले,उपाध्यक्ष विशाल मुकदान, सचिव नागनाथ शिंदे,तर सहसचिव नितीन सुरवसे याची सर्वानुमत्ते निवड करण्यात आली. सदर बैठकीस भिमनगर व बौद्ध नगर मधील बौद्ध उपासक, युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
सदर बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली असुन यावर्षी मंडळाने १४ एप्रिल ते ३o एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे ठरविले आहे .
नविन जयंती उत्सव समितीचे मंडळांच्या वतीने स्वागतपर सत्कार करण्यात आला .
या वेळी महादेव नागिले, रत्नाकर मुकदान, विनायक नागिले, बुद्धा नागिले, विठ्ठल वाघमारे, नागनाथ माने, बाबू माने, सुधाकर नागिले,संगमेश्वर बनसोडे, संजय नागिले, आदी भीम सैनिक उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india