विराट हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात !
तुरोरी दमयंती भालेराव.
येथील वृंदावन नगर – मलंग प्लॉट भागातील श्री हनुमान मंदिर देवस्थान येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
प्रति वर्षा प्रमाणे येथील विराट हनुमान देवस्थानच्या वतीने बुधवारी गुरुवारी भजन , किर्तन ,प्रवचन हरिजागर, इत्यादी धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रम घेण्यात आले. बुधवारी सायंकाळी हभपअरुण मुळजे महाराज रामलिंग मुदगड यांच्या भजनी मंडळाचा कार्यक्रम संपन्न झाला.
गुरुवार दि. २एप्रिल रोजी कासार शिर्शी येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक महेश कल्याणी यांच्या शुभहस्ते श्रींची महा पुजा व अभिषेक करण्यात आला. श्री संगमेश्वर स्वामी यांच्या अध्यात्मिक पौराहित्याचा भाविकांना लाभ झाला. उमरगा नगर परिषदेचे नूतन नगराध्यक्ष किरण गायकवाड ,उपनगराध्यक्ष विजय वाघमारे,डॉ. सचिन तावशीकर,डॉ. नामदेव बिराजदार ,डॉ. विकास राठोड,डॉ. निलेश येळापूरे,डॉ. दत्तात्रय खलंगरे, साहिल इंगळे, आशोक चोबे यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली.
राजकुमार दुधनाळे, सुधीर कुरूम , भरत चौधरी , दयानंद बिराजदार , प्रदीप गावकरे , प्रा. युसूफ मुल्ला , काशिनाथ कोठे, दयानंद बिराजदार , शंकर बिराजदार , शोभा बिराजदार, सुजाता कुरूम , कोमल जवळगे, अंजली दुधनाळे , सुजाता हेबळे, सुनिता हंगरगे, संगीता पाटील ,सुनिता पवार , सुषमा तोळणूरे, उज्वला होगाडे,मधुमती सुर्यवंशी , सौ. मुरुमकर सह मलंग प्लॉट , वृंदावन नगर पिस्के प्लॉट या विविध भागातील श्री हनुमान भक्तांनी जन्मोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
गुरुवारी सकाळी श्री हनुमान जन्मोत्सव पाळणा महिला भक्तगणांच्या वतीने सादर करण्यात आला. श्री हनुमान जन्मोत्सवा निमित्त गुलालाची उधळण करण्यात आली.वैष्णवी जवळगे , नेहा दुधभाते , साक्षी दुधनाळे यांनी श्री हनुमानांची अप्रतिम हुबेहुब रांगोळी काढून भाविकांचे लक्ष वेधून घेतले.







