एकुरगा येथे मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद सस्त्याचे शरण पाटील यांच्या हस्ते थाटात भुमीपुजन सोहळा संपन्न.
तुरोरी दमयंती भालेराव.
तालुक्यातील मौजे एकुरगा येथे दि ३रोजी शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. हा रस्ता ४ किलोमीटरपर्यंतचा असून, या रस्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला मोठा फायदा मिळणार आहे.
या उदघाट्न सोहळ्याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भालेराव, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, पंचायत समिती सदस्य हरिभाऊ जाधव, पंचायत समिती सदस्य अमर वाले, पंचायत समिती सदस्य दगडू मोरे, उमरगा पंचायत समिती माजी सभापती सचिन पाटील, अनिल सगर, महेश माशाळकर, मल्लिनाथ स्वामी, विश्वनाथ गुंजोटे, महेश लिंबाळे, विजय सोनकांबळे, सुनील जवळगे, सुधीर म्हात्रे, किशोर औरादे, शिवाजी मोरे, बाबुराव पाटील, बाळू करके, दीपक करके, दत्ता कुनाळे, दिलीप जवळगे, विश्वनाथ वाघमोडे, प्रकाश म्हात्रे, हरूण शेख, संभाजी म्हात्रे, आपास घंटे, विलास लिंबाळे यांच्यासह गावातील विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
तालुक्यात मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्त्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना शेतीला येण्या जाण्यासाठी अडचणीच्या मार्गतुन सुखकर रस्ता शरण पाटील फांऊंडेशन च्या माध्यमातून होत असल्यामुळे शरण पाटील फांऊंडेशन चे तालुक्यात सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जाते आहे.








