पौर्णिमा बहुउद्देशीय संस्था अणदूर यांच्या कडून मारुती बनसोडे यांचा सत्कार
——————————————————-
नळदुर्ग (एस. के.गायकवाड):
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या कडून व्यसनमुक्ती साठी दिला जाणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०२३- २४ हा मानाचा पुरस्कार परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग चे संस्थापक सचिव मारुती तात्याराव बनसोडे यांना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांच्या हस्ते दिनांक २६ मार्च २o२६रोजी मुंबई येथे देण्यात आला. मारुती बनसोडे गेली ४o वर्षे सामाजिक कार्यात सातत्याने काम करीत आहेत.डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या सोबत दहा वर्षे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले आणि परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग चे माध्यमातून गेली ३o वर्षे महिला सक्षमीकरण, पाणी, पर्यावरण, शेती, व्यसनमुक्ती याविषयावर काम करील आहेत. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे धाराशिव जिल्हा संघटक म्हणून गेली चार वर्षे शाळा, कॉलेज, वसतिगृहात जाऊन व्यसनमुक्ती या विषयावर प्रबोधन करीत आहेत. या कामासाठी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देऊन मारुती बनसोडे यांचा राज्य सरकारने यथोजित सन्मान केल्या बद्दल पौर्णिमा बहुउद्देशीय संस्था अणदूर च्या अध्यक्षा सुजाता उर्फ बाबई चव्हाण यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी भैरवनाथ कानडे, सुभद्राताई मुळे, कस्तुराताई कारभारी, रेवणसिद्ध कारभारी, कल्पनाताई गायकवाड, नागेश चव्हाण उपस्थित होते






