लोहगाव येथील सार्थक गायकवाड बौध्दाचार्य परिक्षेत उत्तिर्ण
————————————————-
नळदुर्ग (एस. के. गायकवाड ):
लोहगाव ता.तुळजापूर येथील युवा बौध्द उपासक सार्थक यल्लाप्पा गायकवाड हल्ली मुक्काम पुणे यानी भारतीय बौध्द महासभेच्या वतीने घेण्यात आलेल्या बौध्दाचार्य या परिक्षेत उत्तिर्ण झाला आहे.
. भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या बौद्धचार्य या परीक्षेमध्ये सार्थक गायकवाड यानी सहभाग घेतला होता. सदर परिक्षेचा निकाला नुकताच लागला असून या बौध्दाचार्य परिक्षेत उत्तिर्ण होऊन त्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
बौद्ध धम्माच्या प्रसार आणि प्रचार करण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक संस्थेची स्थापना केली असून दरवर्षी या संस्थेच्या वतीने प्रशिक्षण शिबिर भरून बौद्धाचार्याची परीक्षा घेतली जाते.सार्थक गायकवाड हा इंजिनिअरिंगचे पदवी शिक्षण घेत घेत त्यांनी स्वतःला बौद्ध धम्म चळवळीशी,आंबेडकरी चळवळीशी जोडून घेतले असून भारतीय बौद्ध महासभा पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बौद्धाचार्य परीक्षेत तो उत्तीर्ण झाला आहे.
त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल भारतीय बौद्ध महासभा पुणे यांनी आयोजित केलेल्या महिला धम्म मेळाव्यात सार्थक गायकवाड यास बौद्धचार्य प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे अध्यक्ष के.बी.मोटघरे,
डी.एन.धाईंजे,राजकुमार गायकवाड ,संदीप सोनवणे, बौद्धचार्य निलेश गायकवाड, आयुष्यमती दिपालीताई निलेश गायकवाड आदी मान्यवरासह संपूर्ण परिवार या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांच्य या यशा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.







