पंडीत दिनदयाळ उपाध्य निवासी प्रशिक्षण चाकुर येथे माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न.
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
लातूर जिल्ह्यातील चाकूर मंडळांतर्गत पंडित दीनदयाल उपाध्याय निवासी प्रशिक्षण महाभियान कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यशाळेच्या प्रथम सत्राचे पुष्प गुंफताना प्रदेश प्रवक्ते आणि कार्यशाळेचे निमंत्रित वक्ते गणेशजी हाके यांनी पक्षाचा इतिहास, वाटचाल आणि भविष्यातील अजेंडा, कार्यशाळेचे महत्व. उद्दिष्ट्ये यासह संघटनेच्या संपूर्ण विषयावर प्रभावी आणि सखोल मार्गदर्शन केले. तर सत्राचे दुसरे पुष्प गुंफताना देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे प्रमुख देवेंद फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारच्या कल्याणकारी योजना बाबत लातुर ग्रामिण चे जिल्हाध्यक्ष बसवराज पटिल यांनी संवाद साधला.
पक्षात सक्रीय होऊन काम करण्यासाठी पदाधिकारी यांनी नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान पक्षातील काही कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देऊन नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. यामध्ये रामलिंग स्वामी यांची युवा मोर्चा तालुकाध्यक्ष म्हणून, बापूराव कलवले यांची अनुसूचित मोर्चा तालुकाध्यक्ष म्हणून, सौ. रेणुकाताई तोरकडे यांची महिला मोर्चा तालुकाध्यक्ष म्हणून तर सागर क्षीरसागर यांची युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.नवीन जबाबदारी स्वीकारलेल्या सर्व मान्यवरांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले तसेच त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी मंत्री बसवराज पटिल यांच्या समवेत या कार्यशाळेला प्रदेश प्रवक्ते गणेशजी हाके, बाजार समिती सभापती निळकंठ मिरकले, चाकूर मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश्वरजी पवार, नळेगाव मंडळाचे अध्यक्ष रणजितजी मिरकले, व्यापारी मोर्चाचे मेघराजजी बाहेती, जिल्हा सरचिटणीस सौ. मनिषाताई नवने, शहर मंडळ अध्यक्ष प्रशांत बिबराळे, सज्जनजी लोणाळे, नगरसेवक नितीनजी रेड्डी, युवराजजी पाटील, संतोष माने, रमेश पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.








