Best News Portal Development Company In India

भाजप वर्धापन दिनानिमित्त करमाळ्यात भव्य रक्तदान व आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन ! अविनाश जोशी/करमाळा

भाजप वर्धापन दिनानिमित्त करमाळ्यात भव्य रक्तदान व आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन
अविनाश जोशी/करमाळा
भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त करमाळा शहरात समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत भव्य रक्तदान शिबिर तसेच मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
हे शिबिर सोमवार, दिनांक 06 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत न. प. सांस्कृतिक सभागृह, खोलेश्वर मंदिर समोर, करमाळा येथे पार पडणार आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जात असून “आपले एक रक्तदान — कुणाचे तरी जीवनदान” या भावनेतून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. तसेच आयुष्यमान भारत कार्ड हे गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरोग्य सुरक्षा कवच ठरत असल्याने या शिबिराचा लाभ घ्यावा, असेही सांगण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन दिपक अरुण चव्हाण (नगरसेवक, गटनेता भाजप, करमाळा नगर परिषद) यांच्या वतीने करण्यात आले असून, शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समाजहितासाठी आयोजित या उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान व आयुष्यमान कार्ड नोंदणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india