Best News Portal Development Company In India

तुळजापुरात प्रामाणिकतेचे दर्शन! भाविकाची १० हजारांची रोख अन् परदेशी चलनासह हरवलेली पर्स होमगार्डने केली परत !

तुळजापुरात प्रामाणिकतेचे दर्शन! भाविकाची १० हजारांची रोख अन् परदेशी चलनासह हरवलेली पर्स होमगार्डने केली परत !
​तुळजापूर (प्रतिनिधी): होमगार्डची कर्तव्य दक्षता.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी जगत जननी तीर्थक्षेत्र श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सध्या भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. याच गर्दीत ठाणे येथील एका भाविकाची महत्त्वाची कागदपत्रे आणि रोकड असलेली पर्स हरवली होती. मात्र, कर्तव्यावर असलेल्या होमगार्ड आणि सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे व प्रामाणिकतेमुळे ही पर्स संबंधित भाविकाला सुखरूप परत मिळाली असून, या घटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
​सोमवार, ६ एप्रिल रोजी ठाणे येथील भाविक श्री. विनायक रवींद्रनाथ आदम हे कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन जात असताना मंदिर प्रशासन कार्यालयासमोर त्यांची पर्स चुकून पडली. पर्समध्ये
​रोख रक्कम: १०,३३० रुपये , ​परदेशी चलन
​महत्त्वाची वैयक्तिक कागदपत्रे.
​होमगार्ड आणि सुरक्षा रक्षकांची तत्परता
​प्रशासन कार्यालयासमोर गस्तीवर असताना होमगार्ड जवान श्री. पवार यांना ही पर्स आढळली. त्यांनी वेळ न घालवता तातडीने सुरक्षा रक्षकांच्या मदतीने ही पर्स दर्शन मंडप नियंत्रण कक्षात जमा केली. त्यानंतर प्रशासनाने घोषणा करून संबंधित भाविकाचा शोध घेतला आणि ओळख पटवून त्यांची संपूर्ण ऐवज असलेली पर्स त्यांना सुपूर्द केली. आपली मौल्यवान पर्स परत मिळाल्याने भाविक विनायक आदम यांनी मंदिर प्रशासनाचे आणि सुरक्षा यंत्रणेचे मनापासून आभार मानले.
​यावेळी सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, सहायक सुरक्षा निरीक्षक नवनाथ खिंडकर, SISPL सुरक्षा निरीक्षक योगेश फडके आणि कमलाकर पवार उपस्थित होते. कठीण प्रसंगात प्रामाणिकपणा जपणाऱ्या होमगार्ड पवार व सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या या कृतीचे मंदिर संस्थानासह भाविकांकडूनही विशेष कौतुक केले जात आहे.
​”भक्तीच्या दारी प्रामाणिकतेचा पहारा…” अशा शब्दांत मंदिर परिसरातील भाविकांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली. भक्ती शक्तीच्या दरबारात प्रामाणिकतेचा हा एक आदर्शच होता.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india