Best News Portal Development Company In India

दि.६ रोजी.उमरगा शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे क्रस्ना डायग्नोस्टिक लि. सी.टी. स्कॅन सेंटर आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला!

उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

दि.६ रोजी.उमरगा शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे क्रस्ना डायग्नोस्टिक लि. सी.टी. स्कॅन सेंटर आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने येथे मोफत सी.टी. स्कॅन सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामुळे उमरगा व परिसरातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, आरोग्य सेवांच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स तसेच आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी “जनसेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेतून रुग्णांची मनापासून सेवा करत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर व दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी ते सदैव तत्पर आहेत. या नव्या सुविधेमुळे परिसरातील रुग्णांना आता मोठ्या शहरात जाण्याची गरज कमी होऊन, स्थानिक पातळीवरच तपासणीची सुविधा मिळणार आहे.

या प्रसंगी आ. प्रविण स्वामी, मुरलीधर मुंगळीकर (मालक), डॉ. कपिल महाजन, डॉ. विकास जाधव, डॉ. सौ. कोमल जाधव मॅडम, अजिंक्य पाटील, प्रकाश आष्टे, सुनिल कुलकर्णी, दगडू मोरे-पाटील, हरीभाऊ जाधव, धिरज बेळंबकर, महेश माशाळकर, सचिन पाटील, मल्लिनाथ स्वामी, राजेश सोनवणे, सदानंद पाटील, प्रशांत मोरे यांच्यासह डॉक्टर संघटना, कर्मचारी वर्ग, ग्रामीण भागातील वडीलधारी मंडळी व युवक मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india