Best News Portal Development Company In India

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आयडियाथाॅन २०२६ स्पर्धेत ४८ युवकांच्या नवीन आयडिया सादर !

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आयडियाथाॅन २०२६ स्पर्धेत ४८ युवकांच्या नवीन आयडिया सादर

तुरोरी दमयंती भालेराव.

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे इनकुबेशन सेंटर फॉर अत्रप्रीनर , करिअर कट्टा आणि ENSIN फोरम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयडियाथाॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या आयडियाथॉन आणि पोस्टर सादरीकरण स्पर्धेला महाराष्ट्र तसेच कर्नाटक मधून 48 युवक, विद्यार्थी, संशोधक यांनी सहभाग घेऊन आपल्या नवनवीन आयडिया चे सादरीकरण केले. संशोधनवृत्ती, नवोपक्रमशीलता, सर्जनशील विचार आणि प्रभावी सादरीकरण कौशल्याला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत एकूण २८ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. विविध सामाजिक, शैक्षणिक, तांत्रिक आणि संशोधनाधिष्ठित विषयांवरील कल्पक संकल्पना विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केल्या.
स्पर्धेचे परीक्षण डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर धाराशिव येथील मॅनेजमेंट सायन्स विभागातील प्रा. डॉ. विक्रम शिंदे आणि डॉ. प्रा. सचिन बसैया तसेच संजय जगताप यांनी केले. नाविन्यता, मांडणी, सामाजिक उपयुक्तता, संशोधनाधिष्ठित दृष्टी आणि सादरीकरण या निकषांवर स्पर्धकांचे मूल्यमापन करण्यात आले. स्पर्धेत प्रथम पारितोषिक चव्हाण जगदीश यांनी पटकावले. त्यांना रु. १,१९९ रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. द्वितीय पारितोषिक विभागून माने साक्षी आणि जाधव मनस्वी तसेच योगेश मुगळे यांना प्रत्येकी रु. ४९९ रोख पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तृतीय पारितोषिक चव्हाण आर. बी. यांनी मिळविले. त्यांना रु. ७९९ रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले.
तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक मुरुगेंद्र वाली यांना रु. ४९९ रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सर्व युवक विद्यार्थ्यां मधून “यंग स्टुडंट आयडिया अवॉर्ड” कु. प्रियंका इंगळे यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह, तर संशोधक विद्यार्थ्यां मधून “रिसर्च स्कॉलर इनोव्हेशन आयडिया अवॉर्ड” विजापूर येथील इराण्णा जबा यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
बक्षिस वितरण कार्यक्रम अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास इंगळे होते. त्यानी अध्यक्षीय समारोपात बोलताना या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपले विचार, संशोधनाधिष्ठित संकल्पना आणि नवकल्पना मांडण्याचे प्रभावी व्यासपीठ मिळाले. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संशोधनाभिमुखता आणि उद्योजकतेची प्रेरणा निर्माण होते, असे मत व्यक्त केले.
स्पर्धेतील विजेत्यांना प्राचार्य डॉ. संजय अस्वले, उपप्राचार्य डॉ पद्माकर पिटले, प्रा. जी. एस. मोरे तसेच मा. संजय जगताप यांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिअर कट्टा चे समन्वयक डॉ एस पी पसरकल्ले, आणि प्रास्ताविक डॉ सी. डी करे यानी तर आभार प्रदर्शन डॉ एस टी. तोडकर यानी मानले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india