Best News Portal Development Company In India

​तुळजापुरात शेतकऱ्याच्या विहिरीवरील डीपीची चोरी ; ३८ हजारांचे साहित्य लंपास ! ​

​तुळजापुरात शेतकऱ्याच्या विहिरीवरील डीपीची चोरी ; ३८ हजारांचे साहित्य लंपास!
​तुळजापूर (प्रतिनिधी): अज्ञात चोरट्याने तुळजापूर
तालुक्यातील गोपाळ नगर येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील विद्युत डीपी (रोहित्र) अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील ऑईल आणि ॲल्युमिनियम कॉईल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​फिर्यादी संजय राजाभाऊ व्हटकर (वय २७ वर्ष, रा. गोपाळ नगर, तुळजापूर) यांचे बारुळ शिवारात गट नं. ६१७ मध्ये शेत आहे. या शेतातील विहिरीजवळ असलेल्या विद्युत डीपीला अज्ञात चोरट्यांनी लक्ष केले. चोरट्यांनी डीपी मधील ​८० लिटर ऑईल
​तीन कप्प्यातील ॲल्युमिनियम कॉईल
​असा एकूण ३८,००० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे. ही चोरी दि. ६ एप्रिल २०२६ पूर्वीच्या कालावधीत झाल्याचे समोर आले आहे.
​या चोरीप्रकरणी संजय व्हटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. ६ एप्रिल रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ऐन गरजेच्या वेळी डीपीमधील साहित्याची चोरी झाल्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले असून सिंचनाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. सदर घटनेची रीतसर चौकशी करून लवकरात लवकर कारवाई करावी. अशी नागरिकांतून मागणी होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india