Best News Portal Development Company In India

श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेला यंदा ३६ लाख २६ हजार रुपयाचा नफा !

श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेला यंदा ३६ लाख २६ हजार रुपयाचा नफा.
उमरगा लोहारा आदिनाथ भालेराव.
दि.(८)येथील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था म. मुरुम येथील बसव सहकार भवन या इमारतीत सोमवारी (दि६) दुपारी ४ वाजता पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली. ३१ मार्च २०२६ च्या तेरीज पत्रक नफातोटा, ताळेबंध या आर्थिक पत्रकावर चर्चा करण्यात आली. पतसंस्थेचे यंदाचे १६ वे वर्ष असून यंदाच्या आर्थिक वर्षात पतसंस्थेस ३६ लाख २६ हजार ८०६ रुपयाचा निव्वळ नफा झाला आहे. या पतसंस्थेकडे यंदा १५ कोटी ९३ लाख ६५ हजार ६४७ रुपयाच्या ठेवी आहेत. संस्थेने यंदाच्या आर्थिक वर्षात १२ कोटी ८३ लाख ६१ हजार ९५५ रुपयाचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेची इतर बँकेत गुंतवणूक ६ कोटी २२ लाख ६१ हजार ८०८ रुपये. या पतसंस्थेचे सदरील वर्षात खेळते भागभांडवल २१ कोटी ३३ लाख ४ हजार ७५७ रुपये आहे. या पतसंस्थेचे मार्च अखेर ४२९४ सभासद आहेत. संस्थेच्या स्थापनेपासूनच ऑडीट वर्ग ‘अ ‘ दर्जा प्राप्त असून संपूर्ण संगणकीकृत आहे. सध्या पतसंस्थेची वाटचाल शासकीय धोरणानुसार कॅशलेस व्यवहाराकडे चालू आहे. सात वर्षापासून आरटीजीएस / एनएफटी ची सुविधा चालू असून मोबाईल बॅकिंगचा सभासद लाभ घेत आहेत. व्यवहार करताक्षणी एसएमएस सभासदाना प्राप्त होतो. ठेवीच्या अनेक योजना असून यात महालक्ष्मी लखपती योजना, गणेश युवा मंगल योजना, स्वप्नपुर्ती योजना, सरस्वती मासिक प्राप्ती ठेव योजना, स्वामी विवेकानंद ठेव योजना, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शिक्षण ठेव योजना, सीता स्वयंवर ठेव योजना, महात्मा बसवेश्वर लखपती ठेव योजना आदी चालू आहेत. महावितरण कंपनीचे वीज बील भरणा केंद्र, ११ टक्के सोने तारण कर्ज तर ११.५० टक्के वेअर हाऊस तारण, १३ टक्के गहाण कर्ज, १४ टक्के सामान्य कर्ज आदी सोयी ग्राहकांच्या फायद्यासाटी संस्थेकडून पुरविल्या जातात. संस्थेकडे स्वत:ची स्वतंत्र लाॅकर उपलब्ध करुन दिले आहे. टाटा कं. चे सोलार कार्यान्वित केले आहे. या बैठकीत पतसंस्थेचे उपाध्यक्ष शरणप्पा मुदकण्णा, सचिव कमलाकर जाधव, अमृत वरनाळे, मनिष मुदकण्णा, श्रीशैल बिराजदार, बाबासाहेब पाटील, मनोज बोंदर, इंद्रजित लोखंडे, सौ. संगीता जाधव, सौ. वंदना सोनवणे, शिवराज समन, अनंत हिरमुखे, शाखाधिकारी दत्तात्रय कांबळे, कॅशिअर चिदानंद स्वामी, प्रशांत काशेट्टे, सचिन कंटेकूरे, सौ. नेहा शेवाळकर, पिग्मी एजन्ट संतोष मुदकण्णा, महातंय्या स्वामी, राजेंद्र मुदकण्णा, गुंडेराव गुरव आदींसह कर्मचारीवृंद व सभासद यांच्या सहकार्यांने पतसंस्था यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे. यंदा ठेवीमध्ये वाढ, थकीत कर्जदारांवर कडक कार्यवाही करून वसुली करण्यात येत असून यंदाचा वर्धापन दिन १२ मे रोजी होणार असल्याचे चेअरमन शिवशरण वरनाळे यांनी माहिती दिली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india