Best News Portal Development Company In India

उमरगा-लोहारा तालुक्यातील महावितरणच्या समस्यांबाबत विशेष आढावा बैठक संपन्न!

उमरगा-लोहारा तालुक्यातील महावितरणच्या समस्यांबाबत विशेष आढावा बैठक संपन्न.
६ नवीन सबस्टेशन् या वर्षात तयार होतील .
उमरगा लोहारा आदिनाथ भालेराव.
उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शेतकरी व सामान्य नागरिकांच्या महावितरणशी संबंधित ज्वलंत समस्यांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी मंगळवार,( दि.७) रोजी उमरगा तहसील कार्यालय येथे विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रवीणजी स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार स्वामी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिलासा दिला की, उमरगा आणि लोहारा तालुक्यात एकूण सहा नवीन सबस्टेशन्सना मंजुरी मिळाली आहे. या नवीन प्रकल्पामुळे पुढील वर्षापासून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून, गेल्या अनेक वर्षांपासून विजेअभावी होणारी त्यांची गैरसोय कायमस्वरूपी दूर होणार आहे.
बैठकीदरम्यान उपस्थित नागरिक आणि शेतकऱ्यांनी तक्रारींचा पाढाच आमदारांसमोर वाचला. प्रलंबित नवीन वीज कनेक्शन, जळालेले ट्रान्सफॉर्मर वेळेत न बदलणे आणि वाढीव वीज बिलांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले.

उमरगा औद्योगिक वसाहतीत कारखान्याना महावितरणच्या असंख्य अडचणींना तोंड देण्यात येत आहे येत्या २ आठवड्यात समस्या दूर करण्यात येतील असे कार्यकारी अभियंता नंदकुमार काळे यांनी सांगितले
यावेळी युवा नेते अजिंक्य बापू पाटील, कार्यकारी अभियंता नंदकुमार काळे, उपकार्यकारी अभियंता अवताडे एस. जी., पंचायत समिती सदस्य हरिदास जाधव, उपतालुका प्रमुख सुधाकर पाटील, सिद्दाराम हत्तरगे, जकेकुर वाडी गावचे सरपंच अमर सुर्यवंशी यांच्यासह महावितरणचे विविध विभागांचे सहाय्यक व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते. आमदार स्वामी यांनी सर्व प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india