Best News Portal Development Company In India

उमरग्यात वीरशैव कक्कय्या महाराज जयंती उत्साहात; भव्य मिरवणुकीने शहर दुमदुमले !

उमरग्यात वीरशैव कक्कय्या महाराज जयंती उत्साहात; भव्य मिरवणुकीने शहर दुमदुमले

उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.
बाराव्या शतकातील थोर शिवशरण आणि क्रांतीकारक वीरशैव कक्कय्या महाराज यांची जयंती उमरगा शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशांचा गजर आणि लेझीम पथकांच्या शिस्तबद्ध सादरीकरणामुळे संपूर्ण शहर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले होते. मिरवणुकीची सुरुवात शहरातील गौतम नगर येथील चौकातून करण्यात आली. यावेळी कक्कय्या महाराजांच्या प्रतिमेचे मा.आमदार ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्ष किरण गायकवाड, सभापती ॲड.आकांक्षा चौगुले, दत्ता कटकधोंड, जितेंद्र चौगुले, संदीप चौगुले आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या लेझीम पथकाने सादर केलेली विविध कलाकृती आणि ढोल पथकाच्या कडकडाटाने मिरवणुकीत मोठी रंगत आणली. मिरवणुकीने उमरगा शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण केले होते.

तालुकाध्यक्ष संदीप चौगुले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मिरवणुकीच्या यशस्वितेसाठी अंबादास सोनकावडे, ज्योतिर्लिंग सोनकावडे, सुरज कटके , लक्ष्मण खरटमोल, केतन कटके, सटवाजी चौगुले, शरद कटके , संतोष कटके, प्रशांत सोनकवडे, जयदीप सोनकवडे, पारपा कटके , कृष्णा कटके , राहुल कटके, सचीन कटके, बालाजी कटके , बालाजी चौगुले, खंडू कटके , सचीन चौगुले, महादू चौगुले, बालाजी चौगुले, मनोज कावळे, विठ्ठल कावळे, विजय कटके , मनोज जाधव आदींनी अथक परिश्रम घेतले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india