Best News Portal Development Company In India

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्याकडून पशुपालकांना मदत !

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्याकडून पशुपालकांना मदत .
– – – – – – – – – – – – – – – – – – –
जळकोट ( अरुण लोखंडे) तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे गेल्या पंधरा दिवसां खाली अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून जनावरे दगावले होते . अश्या शेतकऱ्यांना अर्चनाताई पाटील यांच्याकडून आर्थिक मदत करण्यात आली
याबाबत प्राप्त माहिती अशी की जळकोट आणि परिसरात गेल्या पंधरा दिवसां पूर्वी अवकाळी पाऊस होऊन गारपिट झाले होते या गारपीटा मुळे फळबागांचे व पिकांचे आतानोत नुकसान झाले होते काढणीला आलेली ज्वारी गहू हरभरा आदी पिकांचे नुकसान झाले होते तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बांधलेली जनावरे गारपिटीमुळे दगावली होती . या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा पंचायत समीतिचे सदस्यअँड अशिष सोनटक्के यांनी तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगतसिंह पाटील यांना सदर घटनेची माहिती सांगितली आणि आपण काहीतरी मदत या शेतकऱ्यांना करावी अशी विनंती केली तात्काळ प्रशासनाला शेतकऱ्याच्या बांधावर जावून ज्याचे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आणि प्रशासनाच्या वतीने पंचनामे ही करण्यात आले . व ज्या ज्या शेतकऱ्यांची व पशुपालकांचे जनावरे गारपिटा मुळे दागवली होती . त्याबाबत माहिती दिली असता येथील पशुपालक मनिषा नंदकुमार गायकवाड याची गाय मरण पावली तर बसवराज छत्रे याची म्हैस दगावली होती आणि येथील युवक बालाजी विजय लोखंडे यास आर्धागवायू झाल्याने तो विकलांग झाला असून त्यालाही आर्थिक साहय करण्यात आले . आमदार राणा जगतजीत सिंह पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषेदेच्या अध्यक्षा अर्चनाताई राणा जगजीत सिंह पाटील यांच्या वत्तीने नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना ॲड आशिष सोनटक्के यांच्या हस्ते प्रत्येकी दहा हजाराचा धनादेश देण्यात आला यावेळी माजी सरपंच तमाणाप्पा माळगे संजय अंगुले अरविंद लोखंडे अरुण लोखंडे सतिश माने सागर लोखंडे मंगेश सुरवसे प्रविण जाधव नागनाथ किलजे सतिश गायकवाड नागनाथ लोखंडे सह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते . यावेळी शेतकरी व पशुपालकांनी आमदार राणा जगजीत सिंह पाटील व अर्चनाताई पाटील याची आभार मानले .

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india