Best News Portal Development Company In India

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उमरगा शहरात साजरी ! उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उमरगा शहरात साजरी
उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.
दि.११ रोजी शहरातील नगरपरिषद समोरील भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली .
यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेस मुळज येथील ज्येष्ठ उपासक केशव ग्यानबा कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले तद नंतर डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका सरचिटणीस संगीताताई सोनकांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले व सामूहिक बुद्ध वंदना त्रीसरण, पंचशील ग्रहण करण्यात आले.
यावेळी अविनाश भालेराव सर ,राजेंद्र सूर्यवंशी सर ,किरण कांबळे ,जीवन सूर्यवंशी ,मिलिंद कांबळे ,धीरज कांबळे, भारिप चे नेते रामभाऊ गायकवाड, नेताजी गायकवाड, उमेश सुरवसे, हनुमंत कांबळे, अदिसह बौध्द उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष सुरवसे यांनी केले तर आभार आनंदकुमार कांबळे यांनी मानले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india