Best News Portal Development Company In India

व्रत पत्र विक्रेत्यांच्या विविध मागणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संघटणेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले !

व्रत पत्र विक्रेत्यांच्या विविध मागणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संघटणेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
दिलेल्या निवेदनात सादर की, १०ऑक्टोंबर २०२४ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना ही राज्यातील तीन लाख वृत्तपत्र विक्रेत्यांचे संघटन करणारे एकमेव शिखर संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षापासून आम्ही वरील विषयी पाठपुरावा करत आहोत यामुळेच आपण मुख्यमंत्री असताना १० ऑक्टोबर २०२४च्या मंत्रिमंडळ बैठकीत स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळास मान्यता देवुन मंत्रिमंडळ दिलेल्या मान्यतेनुसार वृत्तपत्र विक्रेत्यांच्या साठी स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ बाबत शासन आदेश शासन निर्णय लवकर काढून वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ कार्यरत करावे यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करावे आमच्या प्रति असणारे आपुलकी आपले निर्णय घेण्याची गती व सामान्य लोकांना न्याय देण्याचे धोरण पाहता आपल्याकडून आपल्याकडूनच आम्हाला खूप आशा आहेत आपण हा विश्वास आहे तरी आपण वृत्तपत्र क्षेत्रातील घटकाचे स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाबाबत आवश्यक कार्यवाही करून हे मंडळ कार्यान्वित करण्यासाठी विनंती दिनांक १२एप्रिल २०२६ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्य यांना महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप नागदे जिल्हा उपाध्यक्ष रोहित थोरवे सचिव गणेश भातुसे
रमेश बसगुंडे, विकास मदने, युवराज वटे ,अरविंद शिंदे ,लहू पडवळ ,सुरज बागल, दादासाहेब ननावरे ,अशोक दुबे किशोर गायकवाड, खंडू पवार, मोहन वाघमोडे, हुसेन नूरसे, सुरेंद्र सकरगी, विलास मुळीक, तानाजी घोडके
यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदनाची दखल घेऊन मागण्या मान्य करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india