Best News Portal Development Company In India

माधवराव पाटील महाविद्यालयाच्या ग्रंथालयात विद्यार्थ्यांकडून उस्फुर्त ग्रंथांचे वाचन करून सामाजिक समता दिन साजरा!..तुरोरी दमयंती भालेराव.

माधवराव पाटील महाविद्यालयाच्या ग्रंथालयात विद्यार्थ्यांकडून उस्फुर्त ग्रंथांचे वाचन करून सामाजिक समता दिन साजरा…
तुरोरी दमयंती भालेराव.

यंदाचे वर्ष हे महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाकडून दि. ८ ते १४ एप्रिल या सप्ताह कालावधीत संपूर्ण राज्यभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमानिमित्ताने वाचन उपक्रम शनिवारी (दि११) रोजी आयोजित करण्यात आला होता. या वाचन उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार होते. यावेळी ग्रंथपाल डॉ. राजकुमार देवशेट्टे, डॉ. सायबण्णा घोडके, डॉ. रविंद्र गायकवाड, डॉ. महेश मोटे, डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. राजकुमार रोहीकर, डॉ. अविनाश मुळे, डॉ. राजेंद्र गणापुरे, प्रकाश रोडगे आदींची विशेष उपस्थिती होती. प्रारंभी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पद्मश्री डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, या उद्देशाने ग्रंथालयात विविध ग्रंथांचे वाचन उपक्रमांतर्गत दिवसभर ग्रंथालय खुले ठेवून वाचन दिन उस्फूर्तपणे साजरा करण्यात आला. डॉ. नागोराव बोईनवाड, दत्तू गडवे, नितीन कंटेकुरे, विजयालक्ष्मी भालेराव आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गोपाळ कुलकर्णी तर आभार डॉ. मुकुंद धुळेकर यांनी मानले. यावेळी विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india