Best News Portal Development Company In India

भारतीय जनता पार्टी लातूर (ग्रामीण) जिल्ह्याच्या वतीने आज विधानसभा निहाय नियुक्त ‘बूथ लेव्हल एजंट’ (BLA) साठी ‘मतदार यादी पुनरीक्षण ! उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

भारतीय जनता पार्टी लातूर (ग्रामीण) जिल्ह्याच्या वतीने आज विधानसभा निहाय नियुक्त ‘बूथ लेव्हल एजंट’ (BLA) साठी ‘मतदार यादी पुनरीक्षण.
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
अभियान’ (SIR) कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
“लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार यादी निर्दोष असणे आवश्यक असून, प्रत्येक पात्र मतदाराची नोंदणी करणे हेच या अभियानाचे मुख्य ध्येय आहे,” असे प्रतिपादन कराड यांनी यावेळी केले.
या कार्यशाळेला भाजपा ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री बसवराज पाटील साहेब, औसाचे आमदार अभिमन्यू पवार, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड,माजी आमदार बब्रुवान खंदाडे, जिल्हा परिषद सभापती शिवकन्या गोडभरले, प्रदेश उपाध्यक्ष अर्चना चाकूरकर, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, जिल्हा परिषद गटनेते रामचंद्र तिरुके, अहमदपूर नगराध्यक्ष स्वप्नील व्हते, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष उत्तरा कलबुर्गे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश कराड, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहिदास वाघमारे यांच्यासह पक्षाकडून BLA म्हणून नेमण्यात आलेले प्रा.भीमाशंकर राचट्टे, सिद्धेश्वर पवार, कुमोद लोभे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामचंद्र तिरूके यांनी केले, सूत्रसंचालन चंद्रप्रकाश हांगे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सिद्धेश्वर पवार यांनी मानले. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व BLA आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या महत्त्वपूर्ण कार्यशाळेत जिल्हाध्यक्ष या नात्याने उपस्थित राहून जिल्ह्यातील अभियानाचा सविस्तर अहवाल सादर केला. लातूर ग्रामीण जिल्ह्यातील प्रत्येक बूथवर हे अभियान प्रभावीपणे राबवून शंभर टक्के त्रुटीमुक्त यादी तयार करण्याचा आमचा संकल्प आहे. विशेषतः १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांची नवीन नोंदणी, विवाहित महिलांच्या नोंदणीसाठी २००२ च्या यादीचा तांत्रिक आधार आणि डिजिटल माध्यमांचा वापर यावर आम्ही भर दिला आहे.
लोकशाहीच्या या उत्सवात प्रत्येक मतदाराचा सहभाग निश्चित करण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते आता सज्ज आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india