आजच्या युवक युवतीनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार अंगीकार करून जीवन जगावे : आय पी एस डॉ मेघना मॅडम .
– – – – – – – – – – – – – – – – – – – –
जळकोट (अरुण लोखंडे) विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीयतेचे चटके सहन करून अर्धपोटी उपवासी राहून शिक्षण घेतले आणि फक्त शिक्षणाच्या आणि ज्ञानाच्या जोरावर त्यांनी या देशाला भारतीय संविधान हा महान ग्रंथ दिला म्हणून तुम्ही आम्ही सर्वजन आनंदी जीवन जगत आहोत आणि त्यांनी दिलेले आदर्श विचाराचा आपल्या जीवनात अंगीकार करावा असे प्रतिपादन आय पी एस डॉ मेघना मॅडम यांनी जळकोट येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जंयत्ती दिनी व्यक्त केले .
कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन आय पी एस मेघना मॅडम यांच्या हस्ते पुष्पहार दिप धूप प्रज्वलीत करून करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व जंयती उत्सव समीतीच्या वतीने डॉ मेघना मॅडम याचा फेटा शाल बुके देवून ज्योती लोखंडे याच्या हस्ते सत्कार करण्यात आला संयोजन समीतीचे पदाधिकारी परमेश्वर लोखंडे अरविंद लोखंडे सागर लोखंडे विनोद लोखंडे सतिश माने याचाही सत्कार अरुण लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला . त्यानंतर पुढे बोलताना डॉ मेघना मॅडम म्हणाल्या की खास करून माझ्या समोर बसलेल्या मुला मुलींना मी या प्रसंगी एवढच सांगते की ज्या प्रमाणे बाबासाहेबानी त्यांच्या जीवनात फक्त शिक्षणाला महत्व दिले आणि जगातील सर्वात विधवांना आणि हुशार विद्यार्थी ठरले त्याच प्रमाणे तुम्ही सुद्धा चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन आपण ही आपली प्रगती करावे असे त्या म्हणाल्या . सदरच्या कार्यक्रमात १४ तारखेच्या मध्यरात्री १० ते ११ वाजेपर्यंत महिलानी पाळाणा गित सादर केले व रात्री बारा वाजता संयोजन समीतीच्या वत्तीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले व सोमनाथ गायकवाड शिवाजी लोखंडे विठ्ठल भालेराव याच्या हस्ते निळ्या ध्वज्याचे ध्वज्यारोहन करण्यात आले व सामुदायिक त्रिशरण पंचशिल घेण्यात आले . सदर कार्यक्रमास जि .प .चे माजी सदस्य गणेश सोनटके माजी सरपंच अशोक पाटील ॲड आशिष सोनटक्के माजी सरपंच गजेंद्र कदम प्रकाश चव्हाण महेश कदम कृष्णात मोरे संतोष वाघमारे संजय अंगुले संजय माने विनोद गंगणे मंडळाचे प्रदिप लोखंडे स्वदेश लोखंडे लक्ष्मण लोखंडे सतिश गायकवाड मल्लीनाथ माने शितल माने बेबीसेन लोखंडे झानेश्वर लोखंडे संतोष लोखंडे युवराज लोखंडे लहू लोखंडे हरिदास लोखंडे प्रकाश लोखंडे जीवन गुळे शुभम पासोडे ओम भालेराव रोहीत माने विशाल माने सुमत लोखंडे सन्नी गायकवाड सह भिमनगर मधील बौद्ध उपासक उपासिका गावातील सामाजीक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी फटक्याची भव्य दिव्य अतिषबाजी करण्यात आली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर लोखंडे यानी केले तर आभार अरविंद लोखंडे यांनी मानले








