Best News Portal Development Company In India

याकतपूर मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांची जयंती विविध उपक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

याकतपूर मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांची जयंती विविध उपक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
औसा तालुक्यातील याकतपूर गावामध्ये दि १४एप्रिल चे औचित्य साधून महामानव भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना १३५व्या जयंतीनिमित्त अभिवादन करून करून सामूहिक बुद्ध वंदना, त्रीसरण पंचशीला ग्रहण करुन मानवंदना घेण्यात आली .
यावेळी कार्यक्रम जि प प्रा शाळेचे याकतपूर येथील मुख्याध्यापक शिरसाट सर यांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी गावचे सरपंच बालाजी बाडगिरे प्रमुख पाहुणे जावेद भाई शेख अदिसह मान्यवर उपस्थित होते शाळेतील विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनचरित्र्यावर सखोल भाषणं करुन उपस्थितांचे मने जिंकली व अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यावर जावेद भाई यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले यानंतर भीमज्वाला ग्रुप व जयंती कमिटीच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी भीमज्वाला ग्रुप चे सर्व सदस्य व बौद्ध उपासक उपासीका सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी भारतरत्न डा. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india

​महाडच्या सत्याग्रहाने रचला भारतीय सामाजिक क्रांतीचा पाया… प्रा. डॉ. महेश मोटे ​मानवी हक्कांची सनद आणि आत्मसन्मानाचा लढा; आदर्श महाविद्यालयात व्याख्यान संपन्न उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव !