Best News Portal Development Company In India

उमरग्यातील पंचशील नगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ध्वजारोहन ; जयंती उत्साहात !

उमरग्यातील पंचशील नगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ध्वजारोहन ; जयंती उत्साहात

उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.
महामानव भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उमरगा शहरातील पंचशील नगर येथे राष्ट्रवादी चे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार , नगराध्यक्ष किरणजी गायकवाड , पं .स सभापती आकांक्षाताई चौगुले यांच्या हस्ते दि. १४ रोजी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बापू बिराजदार , शरद पवार , अमर देशटवार , अमोल पाटील ,नगरसेवक सचिन जाधव, सुशील दळगडे, शफी चौधरी ,अनिल व्‍हंताळकर, प्रदीपकुमार कांबळे, हनमंत बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उमरगा येथील पंचशील नगर समाज मंदिरात समस्त बौद्ध बांधव व परिसरातील नागरिकांच्या वतीने गौतम बुद्धाच्या मूर्तीचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले तर निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण नगराध्यक्ष किरणभैय्या गायकवाड , पं. स च्या सभापती आकांक्षाताई चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाले. बुद्ध वंदने नंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जयंती कमिटी अध्यक्ष अविनाश खराते . उपाध्यक्ष धीरज कांबळे , सचिव गोरख नागनसुरे, मारुती खराते, सिद्धू जाधव
,सुभाष कांबळे ,बालू गायकवाड ,फुलचंद सुरवसे, आनंद कांबळे ,विशाल भाले ,विजय व्‍हंताळकर , बालाजी भालेराव, राहुल मन्नाडे ,भगवान कांबळे ,सिद्धू कांबळे ,विलास खराते ,पिंटू मोरे , किरण बनसोडे. चंद्रकांत गायकवाड ‘यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india